13/04/2025
Spread the love

अंबाजोगाई (विश्‍वनाथ कांबळे)

डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्योती नगर, उद्यान परिसरातील अतिक्रमणे तात्काळ उठविण्यात यावीत. अन्यथा या प्रश्‍नी तीव्र आंदोलन करण्यात येवून हा प्रश्‍न मार्गी लावू अशा इशारा डॉ.प्राचार्य कमलाकर कांबळे, अ‍ॅड. दिलीप गायकवाड, प्रा.आर आर तागडे,प्रा संभाजी बनसोडे, गुलाब वाघमारे, काशिनाथ नेटके, सिताराम इंगळे,प्रा बी.एस बनसोडे, श्रीमती सुरेखा सिरसाठ यांनी अप्पर जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. या संदर्भात ज्योती नगर परिसरातील रहिवाश्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकार्‍यारी, न.प.मुख्याधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आले आहे.


यापुर्वी ज्योती नगर परिसरातील रहिवाश्यांनी याच प्रश्‍नावर वेळोवेळी जवळपास 23 अर्ज दिले व या अर्जात अतिक्रमणे हटविण्याची मागणी केली गेली. नगर परिषद अंबाजोगाई यांनी ठराव क्रं.113 (दि.16 ऑगस्ट 2018) नुसार येथील ओपन स्पेस भुमी ज्योती नगर सर्व्हे नं.171 बीड 1301 दि.11/08/1988 अन्वये मान्यता दिलेल्या लेआउट मधील ओपन स्पेस वरील अतिक्रमण हटविणे हे जरूरीचे आहे. या ओपन स्पेसला डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान असे नाव देण्यात आले आहे. परंतु या सार्वजनिक जागेवर धनदांडग्या लोकांनी अतिक्रमण केले. हे अतिक्रमण हाटवावे या संदर्भात विभागीय आयुक्त, अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते व या निवेदनात अतिक्रमण हाटविण्याची मागणी ही करण्यात आली आहे.


1 जुलै 2024 रोजी केंद्र सरकारचा नविन आदेश बी.एन.एस.एस./बी.एन.एस.या अन्वये कब्जा, ताबा अतिक्रमणे हे काढणे आत्यावश्यक आहे. 173 कलम अन्वये जर कब्जा ताबा काढला नाही. तर बी.एन.एस.एस. /164 प्रमाणे एस.डी.एम. यांना निवेदन देवून 223 कलम अन्वये गुन्हा दाखल होवू शकतो. ही बाब लक्षात घेवून हा प्रश्‍न त्वरीत निकालीत काढावा. अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
आमच्याशी संपर्क करा.