
अंबाजोगाई -: मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर, डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, डिजिटल मीडिया परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष दिनकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया परिषद अंबाजोगाई च्या वतीने विटा येथील पत्रकार पिसाळ यांच्या वर झालेल्या जीवघेण्या हल्ल्या चा निषेध व्यक्त करत गुन्हेगाराला कडक शासन करत एम पी ए डी ए झोपडपट्टी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावेत या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई येथे देण्यात आले यावेळी डिजिटल मीडिया परिषद अंबाजोगाई चे अध्यक्ष अभिजीत लोमटे,कार्याध्यक्ष सतीश मोरे, उपाध्यक्ष आरेफ सिद्दीकी,ता संघटक सय्यद नईम, मार्गदर्शक गजानन चौधरी वांगीकर मनोज कोकणे, सचिन मोरे, अहमद पठाण, योगेश डाके,विश्वनाथ कांबळे आदी डिजिटल मीडिया परिषद अंबाजोगाईचे सदस्य उपस्थित होते.