
अंबाजोगाई प्रतिनिधी :-
दिनांक 7 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन आणि पंधरवडा निमित्ताने आज अंबाजोगाई येथील वेणूताई चव्हाण महिला कला वाणिज्य महाविद्यालय अंबाजोगाई या ठिकाणी रेड रिबीन क्लबच्या अंतर्गत व स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयव रूग्णालय चा आयसीटीसी यांच्या संयुक्त विद्यमानाने एचआयव्ही जनजागृती आणि एचआयव्ही तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे समुपदेशक श्री धनराज पवार हे उपस्थित होते तसेच महाविद्यालयाचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ विश्वास लवंद सर हे पण या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य माननीय श्रीमती अखिल गौस मॅडम ह्या होत्या तर एनएसएस प्रमुख श्री चव्हाण सर काशीद सर, संध्या ठाकरे मॅडम व इतर सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उपस्थित होते सुरुवातीला महाविद्यालयाच्या वतीने मा श्री धनराज पवार यांचे तसेच विश्वास लवद यांचा स्वागत करण्यात आले त्यानंतर महाविद्यालयाच्या वतीने रेड रिबीन क्लब चा माध्यमातून जे काही कार्यक्रम चालतात याबद्दल विभागाचे प्रमुख श्री चव्हाण सर यांनी सखोल अशी माहिती दिली या यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री धनराज पवार समुपदेशक यांनी व उपस्थित मुलींना असा सल्ला दिला की आपल्या जीवनामध्ये आपण जगत असताना आपल्याला जे काही पाहिजे ते आपण मिळवण्यासाठी कोणत्याही प्रयत्नाला मागे पडत नाहीत परंतु आपल्याला ज्या वेळेस विवाह करायचा असतो त्यावेळेस समोरील मुलांचे किंवा मुलीचे फक्त प्रॉपर्टी आणि इतर गोष्टीचा आपण हवास करतो पण त्याचे आरोग्य कार्ड न तपासताच त्याच्यासोबत आपण विवाह करतो असं न करता प्रत्येक मुलीने विवाह करण्यापूर्वी समोरील मुलाची किंवा मुलाचा एचआयव्ही तपासणी रिपोर्ट इतर सर्व आजाराची तपासणी अहवाल करूनच त्याच्यासोबत विवाह करावा असे आव्हान करण्यात आले यानंतर उपसस्थीत मुलींनी अतिशय चांगल्या प्रतिसाद देत मुलींनी असे सांगितले की सर आम्ही जेव्हा आमचे विवाह होतील ते एचआयव्ही तपासणी किंवा इतर तपासण्या केलेल्या असलेल्या मुलासोबतच करू असा मुलींनी शपथ घेतली यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्य अखीला गोस मॅडम यांनी अध्यक्षीय समारोप केला करताना त्यांनी सांगितलं की महाविद्यालयाच्या वतीने मागील तीन-चार वर्षांपासून रेट रिबीन क्लबच्या माध्यमातून असंख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यासाठी आम्ही धनराज पवार सरांचे आभार व्यक्त केले त्यांनी असे कार्यक्रम आमचा कॉलेज चालु करून दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले त्यानंतर आभार प्रदर्शन काशीद सरांनी केले त्यानंतर मुलींना अल्पोपहार देऊन त्या उपस्थित मुलांनी आपले स्वतःची एचआयव्ही तपासणी करून घेतली या कार्यक्रमाविषयी करण्यासाठी रेखा बनसोडे विमल तरकसे या पण उपस्थित होत्या घेतले व इतर कर्मचारी उपस्थित होते