02/06/2025
Spread the love

अंबाजोगाईत अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच

अंबाजोगाई -: गेली दोन दिवस नगरपालिका प्रशासनाकडून शहरातील नगरपालिकेच्या हद्दीतील अतिक्रमणे हटविली गेल्यानंतर अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बडा हनुमान रस्त्यापर्यंतचे अडीचशेहून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.
अत्यंत मोठ्या प्रमाणावर काढण्यात आलेल्या अतिक्रमणामध्ये ८० टक्के आरसीसी बांधकाम केलेली अतिक्रमणे व उर्वरित २० टक्क्यांमध्ये टपऱ्या व इतर छोटे-मोठे दुकाने यांचा समावेश होता.दहा पोकलेन,पाच जेसीबी ,पाच ब्रेकर, सहा कटर च्या मदतीने या अतिक्रमणावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हातोडा चालवण्यात आला.ही कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली.दरम्यान कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी ,उपकार्यकारी अभियंता गोविंद मुंडे, अभियंता गोविंद शेळके स्वतः उपस्थित होते.सलग तीन दिवस सुरू असलेल्या धडाकेबाज अतिक्रमण हटाव मोहीमेमुळे रस्ते मोठ मोठाले पाह्यला मिळत आहेत.

कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी शंभर पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते.सोमवारी अतिक्रमण काढण्यात येणार असल्याने अनेकांनी आदल्या दिवशी रविवारीच स्वतः होऊन अतिक्रमण काढून घेतले होते.अतिक्रमण हटवितांना कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.यशस्विरित्या ही कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पार पाडली गेली.
मंगळवारी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ते मोरेवाडी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
आमच्याशी संपर्क करा.