
अंबाजोगाई (प्रतिनिधी)- मौजे अंबाजोगाई ता.अंबाजोगाई जि. बीड येथील जुना सर्व्हे नंबर 498 नवीन सर्व्हे / गट नं. 20 आणि जुना सर्व्हे नंबर 500 नवीन स.नं./गट नं. 21 मधील 7/12 भोगवटादार वर्ग -2 (दोन) स्वरूपाच्या नोंदी बेकायदेशीरपने भोगवटादार वर्ग मध्ये रुपांतरीत केलेल्या नोंदी पूर्ववत करणे बाबत व तलाठी संतोष गोवर्धन चव्हाण जोगाईवाडी तलाठी सज्जा मोरेवाडी यांच्या वर कडक कार्यवाही करण्यासाठी ते उपोषणास बसले होते. व त्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.
दरम्यान उपरोक्त संदर्भिय विषयान्वये, आपण विषयांकित प्रकरणाचे अनुषंगाने मा. उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांचेकडे अर्ज सादर केला असून, मौजे अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड येथील जुना सर्व्हे नंबर 498 नवीन सर्व्हे / गट नं. 20 आणि जुना सर्व्हे नंबर 500 नवीन स.नं./गट नं. 21 मधील 7/12 भोगवटादार वर्ग-2 (दोन) स्वरूपाच्या नोंदी बेकायदेशीरपने भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत केलेल्या नोंदी पूर्ववत करणे बाबत व तलाठी संतोष गोवर्धन चव्हाण जोगाईवाडी तलाठी सज्जा मोरेवाडी यांच्या वर कडक कार्यवाही करणे बाबत अन्यथा उपोषणास बसत असले बाबत नमूद केले आहे. त्यानुसार प्रकरणात चौकशी करुन नियमाधीन कार्यवाही अनुसरणेबाबत संदर्भिय पत्रान्वये कळविण्यात आले आहे.
आपले विषयांकित मागणीचे अनुषंगाने प्रकरणात अभिलेखाची पडताळणी करून चौकशी करून नियमाधीन कार्यवाही करण्यात येईल. तसेच त्याबाबत मा. उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई जिल्हाधिकारी बीड यांचेकडे अहवाल सादर करुन केलेल्या कार्यवाहीबाबत आपणासही अवगत करण्यात येईल.