
संघर्षभूमी येथील भीमजयंती महोत्सवात प्रबोधनपर व्याख्यान
अंबाजोगाई (प्रतिनिधी) : संघर्षभूमी येथील १४ दिवसीय भीमजयंती महोत्सवात विविध विषयांवर प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. यात ६ एप्रिल रोजी विश्वविक्रमवीर लेखक तथा प्रेरणादायी वक्ते सर नागेश जोंधळे यांचे ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला तरूण, समाज आणि देश’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत सातपुते हे होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीस वंदनीय तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करण्यात आले. तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर सामुहीक वंदना घेण्यात आली. याप्रसंगी बोलतांना सर नागेश जोंधळे म्हणाले की, तरूणांचा देश म्हणून आज जगात भारताची ओळख आहे. शिक्षण घेऊन स्वतः बरोबरच कुटूंबाची व समाजाची जबाबदारी घेणारा तरूण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आहे. प्रज्ञा, शील व करूणा या मूल्यांचे आचरण करणारा प्रगल्भ समाज त्यांना अपेक्षित आहे. तसेच स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांना प्रमाण मानणारा देश त्यांना अपेक्षित आहे. सर्वांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ व भारताचे संविधान यांचे वाचन करावे व त्यातून त्यांचा व्यापक दृष्टीकोन समजून घ्यावा. सशक्त राष्ट्र निर्मितीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उल्लेखनीय लढा दिला असेही ते म्हणाले. शेवटी भारत सातपुते यांनी अध्यक्षीय समारोप केला.
या कार्यक्रमांमध्येच सात वर्षीय ईश्वरी चोले, सातवीतील आदिश्री बिराजदार व सोहम अंबड यांनी सर नागेश जोंधळे यांच्या मार्गदर्शनात अतिशय प्रभावीपणे सुंदर असे भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. सोबतच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱे प्रा.राहुल सुरवसे, ऍड.दिलीप गोरे , राणी व रूपेश जोगदंड, प्रा.सुनिल वाघमारे, तसेच केवळ दोन महिन्यातच इंग्रजीतील एक लाख वाक्य बोलण्या व लिहिण्याचा विक्रम करणाऱ्या कु.श्रेया पूनम ढोले यांचाही संविधान व पुष्पगुच्छ देऊन गौरव करत जयंती उत्सव समिती व आई सेंटर प्रो तर्फे विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.किर्तीराज लोणारे यांनी केले. तर प्रास्ताविक डॉ.गणेश सुर्यवंशी यांनी केले. आर्थिक अहवालाचे वाचन संजय हतागळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सुभाष घाडगे यांनी मानले. सरणतंय गाथेने कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमास ऍड.शाम तांगडे, बलभीम बनसोडे, मुरलीधर कांबळे, विश्वनाथ सावंत, भुजंगराव जोंधळे, प्रमोद सिताप, सागर पोटभरे, डॉ.इंद्रजित भगत, डॉ.मकरंद जोगदंड, राजकुमार साळवी, देवानंद जोगदंड, धम्मानंद वैद्य तसेच द्रुपदाआई सरवदे, जाईआई हिरवे, स्वाती जोंधळे, सविता लोणारे, धम्मप्रिया लोणारे, संजिवनी घाडगे, ज्योती हतागळे, सुमित्रा पोटभरे, डॉ.सुरेखा चव्हाण, रेखा तरकसे, रमा सिताप, आरती भटकर, वंदना जोगदंड, शोभा घोडके, सरस्वती लांडगे, सोनम घोडके आदींची उपस्थिती होती.