
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी येथील महात्मा ज्योतिबा फुले सेवा संघ, अंबाजोगाई यांच्या वतीने शुक्रवार, दिनांक ११ एप्रिल रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त काढण्यात आलेल्या अभिवादन रॅलीने अंबाजोगाईकरांचे लक्ष वेधून घेतले. उत्स्फूर्त प्रतिसाद देत या अभिवादन रॅलीत महिला भगिनी व युवक त्यांच्या २५० दुचाकींसह सहभागी झाले होते.
अंबाजोगाईत शुक्रवार, दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८ वाजता योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थी वसतिगृहातील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास शांतीनाथ बनसोडे यांच्या हस्ते अभिवादन व पुष्पांजली अर्पण करून जयंती उत्सव सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी बनसोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन ही केले. याप्रसंगी सुत्रसंचालन बी.के.मसने यांनी केले. तर उपस्थितांचे आभार राम वसंतराव घोडके यांनी मानले. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता अभिवादन बाईक रॅली काढण्यात आली. ही बाईक रॅली साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, रणवीर तानाजी मालुसरे चौक, पाटील चौक, योगेश्वरी देवी मंदिर, सिमेंट रस्ता गुरूवार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे निघून संघर्षभूमी येथे विश्व वंदनीय तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून या रॅलीचा समारोप झाला. बाईक रॅली ज्या ज्या चौकातून काढण्यात आली. त्या सर्व चौकातील नामफलकाला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांकडून अभिवादन करण्यात आले. अभिवादन रॅली सवाद्य, शिस्त पाळून काढण्यात आली. उघड्या जीप मध्ये लहान चिमुकल्यांनी महात्मा जोतिबा फुले व माता सावित्रीमाई फुले यांची वेशभूषा परिधान केली होती. तसेच याप्रसंगी फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये महात्मा फुले यांचा अर्धाकृती पुतळा, दर्शनी भागावर भव्य कटआऊट व अर्धाकृती पुतळ्या खालील स्तंभावर म.फुले यांचे प्रबोधनपर विचार, संदेश देणारे घोषवाक्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. अभिवादन रॅलीसाठी महिला भगिनी, युवक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.

रॅली आयोजनासाठी सर्व सन्माननीय समाज बांधवांनी पुढाकार घेतला. त्यांना प्रकाश बलुतकर, विष्णु राऊत, अंकुश घोडके, राम जिरे, संतोष राऊत, अनंत मसने, डॉ.दत्तात्रय मसने, भागवत मसने, करपुडे सर, ज्ञानेश्वर जिरे, बालासाहेब माळी, डॉ.फुटाणे सर, मधुकर घोडके, बंडू मसने, रमेश जिरे, बलुतकर सर, मिलिंद बाबजे, पंकज राऊत, सुशील शिंदे, नितीन जिरे, राम घोडके, मंगेश बलुतकर, अभय जिरे, निवृत्ती जिरे, संदेश डाके, शरद माळी, भारत घोडके, श्रीकृष्ण घोडके, बळीराम धनवडे, आकाश चोपने, गजानन घोडके, योगेश कातळे, अक्षय घोडके, प्रविण चोपने, बालाजी घोडके, बालाजी जिरे, दिपक आरसुडे, ऋषि मसने, कृष्णा मसने, नवनाथ माळी, अनिकेत घोडके, पवन घोडके, अक्षय चोपने, पवन जिरे, दामोदर माळी, भागवत जिरे, किरण भालेकर, सुधीर माळी, रोहन माळी, समाजसेवक बाळु फुलझळके, दत्तात्रय बनसोडे, शाहीर तुकाराम, प्रविण जोगदंड, राहुल जिरे, अतुल राऊत, सतिश राऊत, शिवराज राऊत, संदीपान देशमाने, गोविंद पाथरकर, ऋषि पाथरकर, किरण पाथरकर, नंदकुमार बलुतकर आदींसह महात्मा ज्योतिबा फुले सेवा संघ, अंबाजोगाई यांचे सहकार्य लाभले.