
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी राबविला उपक्रम
अंबाजोगाई(प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मानवलोक सेवाभावी संस्था,जन सहयोगच्या वतीने
तळागाळात जीवन जगणारे सामान्य लोक, वृद्ध निराधार यांना जीवनावश्यक वस्तुंचे वितरण कार्यक्रम विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी घेण्यात आला.
यावेळी जेष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी धनराज मोरे, मानवलोकचे अण्णा साहेब रोहम अरूण आसरडोहकर,पत्रकार राहूल देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते शाम सरवदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.धनराज मोरे म्हणाले की ज्यांना समस्या नाहीत ते सुखी आहेत पण ज्यांच्या समस्या आहेत त्यांच्या समस्यांची उकल व्हावी यासाठी डॉ.लोहिया यांनी उपक्रम राबविले आहेत. कुणाकडून तरी कुणासाठी संधी असते यावर आधारित बोधकथा सांगितली.
मानवलोक संस्था सामाजिक कार्यासाठी ओळखली जाते डॉ. व्दारकादास (बाबूजी) लोहिया यांनी जी पायवाट घालून दिली त्याच पाय वाटेने मानवलोक परिवार जात आहे.
निराधारांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येतात त्यांचे कौतुक केले पाहीजे मानवलोक संस्था निराधार, दीन, दुबळे,पिडित यांच्यासाठी आधार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी उपस्थितांच्या हस्ते जवळपास शंभर निराधार,वृद्ध,महिला यांना जीवनावश्यक वस्तुंचे वितरण करण्यात आले. सुरुवातीला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रास्तविक व संचालन शाम सरवदे यांनी केले संजना आपेट यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी सावित्री सागरे,दिलीप मारवाळ यांनी परिश्रम घेतले.