
अंबाजोगाई (प्रतिनिधी)- स्तनपान सप्ताहाचे निमित्ताने इनव्हीलर क्लब च्या वतीने येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात जन्मदा मातांना पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले.
येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालय विभागातील प्रसुती व स्त्री रोग निवारण अंतर रुग्ण कक्ष क्रमांक ८ व ९ मध्ये प्रसुती विभाग प्रमुख डॉ. गणेश तोंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या स्तनपान सप्ताहात स्तनदा मातांना पोस्टिक ड्राय फ्रूट किसमिस मनुके यांचे वाटप उपस्थित सर्वांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जवळपास ४९ मातांना मनुके पॅकचे वाटप केले.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले डॉ. गणेश तोंडगे , डॉ.अनुष्का , डॉ .अमेरा , तिथल्या प्रमुख इंन्चार्ज परिचारीका शारदा गीत्ते सिस्टर मिरा, इतर सर्व मान्यवर व क्लबच्या देशमुख मॅडम , संगीता नावंदर , जयश्री कराड , अंजली चरखा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार अंजली चरखा यांनी मानले. उपस्थित असलेल्या डॉक्टर, परिचारीका व क्लबच्या सर्व सदस्यांचे मनापासून आभार संयोजकांनी मानले.