अंबाजोगाई (प्रतिनिधी) केंद्रीय मंत्री ना.रामदासजी आठवले यांची बीड शहरात शुक्रवार, दि.१६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ठिक ४ वाजता छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बीड येथे युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइं (ए) चे बीड जिल्हाध्यक्ष पप्पूजी कागदे यांच्या नेतृत्वाखाली पुढील विविध मागण्यांची शासन दरबारी पूर्तता करण्यासाठी विराट जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. तरी या जाहीर सभेसाठी अंबाजोगाई तालुक्यातील रिपाइं (ए) चे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, कामगार, गायरानधारक, महिला, युवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष प्रमोद दासूद यांनी केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रिपाइं (ए) चे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष प्रमोद दासूद यांनी म्हटले आहे की, राज्यासह मराठवाड्यात व बीड जिल्ह्यात पावसाने अडीच महिने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याचा, पाण्याचा व मोल मजुरांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पावसाअभावी राज्यभर दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १ लाख रूपये मदत देण्यात यावी. शेतमजूर, कामगार व मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या कुटुंबियांना ५० हजार रूपये मदत जाहीर करण्यात यावी. अनुसूचित जातीमधील ५९ जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाची प्रक्रिया रद्द करण्यात यावी. कसत असलेल्या २०११ पर्यंतच्या गायरान जमिनींची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यावीत. महागाई निर्देशांकानुसार विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात यावी. आदी मागण्यांची पूर्तता करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड शहरात शुक्रवार, दि.१६ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या विराट जाहीर सभेस बीड तालुक्यातील रिपाइं पदाधिकारी, गायरान धारक, महिला, शेतमजूर, कामगार यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन रिपाइंचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष प्रमोद दासूद, महिला आघाडीच्या महाराष्ट्र सचिव राणी गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष दशरथ सोनवणे, जिल्हा संघटक मनोज इंगळे, राहूल गंडले, भाऊ कोरडे, मधुकर कसबे, गणेश टेकाळे, दिपक कसबे, सुरेश कांबळे, विकास सुरवसे, विलास भागवत, विशाल मस्के, विकास जोगदंड, विलास वाघमारे, राजेभाऊ काशिकर, गोविंद टेकाळे, गणेश कसबे, किरण खंडागळे, विलास वाघमारे यांनी केले आहे.
====================
