
अंबाजोगाई (दि. १० सप्टें.): प्रतिनिधी: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अंबाजोगाई येथील प्रा. सर नागेश जोंधळे यांच्या “आई” संस्थेने आयोजित केलेल्या अभिनव “संविधानभान” उपक्रमाची ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद झाली आहे. या उपक्रमाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देणारी संस्था म्हणून ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ ने सृजनशील कार्याच्या विविध क्षेत्रांतील उपक्रमांची नोंद घेतली आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या विशेष प्रसंगी आयोजित केलेल्या या उपक्रमात अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालय आणि सिताफळ संशोधन केंद्राच्या परिसरात संविधानातील ३९५ कलमांचे शीर्षक असलेले ३९५ फलक प्रदर्शित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आणि मान्यवरांनी हातात फलक घेऊन मानवी साखळी तयार करून भव्य वर्तुळ बनवले. संविधानाविषयी जनजागृती आणि लोकशाहीच्या मूल्यांचा प्रसार हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमात कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी, “आई” सेंटर प्रो चे विद्यार्थी आणि विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. मान्यवरांमध्ये कृषी महाविद्यालय लातूरचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कृषी महाविद्यालय अंबाजोगाई चे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. संजीव बंटेवाड, सिताफळ संशोधन केंद्राचे प्रा. गोविंद मुंढे, सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले, प्रा. डॉ.इंद्रजीत भगत, ज्येष्ठ पत्रकार जगनबापू सरवदे, ऍड.संतोष पवार, कवी राजेश रेवले, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक विष्णू रोडे, सेवानिवृत्त वन अधिकारी शिवाजी गिरी, इंग्लिश विंग्स प्री प्राइमरी स्कूलच्या प्राचार्या स्वाती वाकळे, सीमा पटेकर, प्रा. सचिन कराड, प्रा. राहुल सुरवसे, डॉ. संदीप जैन, प्रतीक गौतम, आदित्य शिंदे, सेजल रोडे, शुभांगी गायकवाड, निकिता काळे, सृष्टी जोगदंड, जयदत्त कुलकर्णी, पृथ्वी कसबे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपक्रमात सहभागी झाले होते. तसेच सामाजिक, शैक्षणिक,वैद्यकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींचाही मोठ्या संख्येने सहभाग होता.
कार्यक्रमादरम्यान संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाची माहिती देण्यात आली आणि संविधानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. प्रा. सर नागेश जोंधळे यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सहभागी व्यक्तींचे आभार मानले आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अशा प्रेरणादायक उपक्रमांचे आयोजन करण्याचे महत्त्व सांगितले.
‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’च्या पदाधिकार्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि प्रा. सर नागेश जोंधळे यांना प्रशस्तीपत्र प्रदान केले. या सन्मानामुळे “आई” संस्थेच्या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, सामाजिक जागरूकतेच्या क्षेत्रात एक नवा विक्रम नोंदवला गेला आहे.
प्रतिक्रिया:
“अंबाजोगाईतील ‘संविधानभान’ उपक्रमाची ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद होणे हे एक अभिमानाचे क्षण आहे. हा विक्रम संविधानाच्या महत्त्वाची जाणीव वाढवण्यासाठी आणि लोकशाहीच्या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी एक पाऊल पुढे आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहभागी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. ‘आई’ संस्था आणि आमच्या सर्व सहकार्यांनी एकत्र येऊन हा उपक्रम शक्य केला, यासाठी आम्ही आभारी आहोत.”
-प्रा. सर नागेश जोंधळे, संस्थापक, “आई” संस्था
“स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित ‘संविधानभान’ उपक्रमाच्या यशाबद्दल प्रा. सर नागेश जोंधळे यांचे अभिनंदन! या उपक्रमाने संविधानाच्या विविध कलमांची माहिती जनतेपर्यंत पोचवली आणि सामाजिक जागरूकतेला नवीन दिशा दिली. ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये या उपक्रमाची नोंद होणे हे एक महत्वपूर्ण आणि गौरवशाली क्षण आहे.”
-डॉ. बाबासाहेब ठोंबरे, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, कृषी महाविद्यालय, लातूर
“‘संविधानभान’ उपक्रमाने संविधानाविषयी जनजागृती करण्याचे कार्य उत्कृष्टरीत्या पार पाडले आहे. प्रा. सर नागेश जोंधळे आणि त्यांच्या टीमने उत्कृष्ट कार्य केले आहे. ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये या उपक्रमाची नोंद होणे हे समाजातील जागरूकतेच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे. या उप्रकमामध्ये सहभागी होता आले याचा आनंद आहे. “
-डॉ. राजेश इंगोले, मानसोपचार तज्ज्ञ