
अंबाजोगाई -:
घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी ठीक 5.00 वाजता
मयूर फिल्म प्रोडक्शन निर्मित योगेश्वरी देवी माहितीपटाचे विमोचन केज मतदार संघाच्या कार्यकुशल आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या उद्घाटन सोहळ्यानिमित्त
ज्येष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा, योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष
श्री.विलासजी तरंगे साहेब
मनोहरी अंबानगरी पुस्तकाचे प्रकाशक
डॉ.रत्नाकर काळेगावकर
अंबानगरीचे माजी उपनगराध्यक्ष सारंग भाई पुजारी,
दीनदयाल बँकेचे चेअरमन एड.मकरंद पत्की, शरयू हेबालकरताई, समृध्द व्यापारचे संपादक दत्तात्रय परळकर हे उपस्थित होते.तसेच अनेक मान्यवर आमंत्रित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रकाश बोरगावकर यांनी केले तर प्रास्ताविक योगेश्वरी माहितीपटचे निर्माते मयूर देशपांडे यांनी केले, यावेळी बोलताना ग्रामदैवत श्री योगेश्वरी देवी यावर आधारित माहितीपट बनवला असून यात श्री योगेश्वरी देवीचा इतिहास संस्कृतिक महत्व, देवीची उपासना, उत्सव समारंभ, या सर्वांचे एकत्रित वर्णन केले असून उत्कृष्ट ऑडियो व्हिडिओ व्हिज्युअल इफेक्ट लोककथा त्यावर आधारित अभिनय अशा सादरीकरण द्वारे माहीतपट तयार केला आहे.तो मयूर फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब वाहीनीद्वारे जास्तीत जास्त भक्तगणांनी पहावा असे आव्हान करण्यात आले. यावेळी मा आ नमिताताई मुंदडा व मान्यवरांच्या हस्ते
निर्माते मयूर देशपांडे, मयुरी जोशी, जनार्दन रेड्डी, अविनाश काळंम यांचा सत्कार करण्यात आला. योगेश्वरी देवल कमीटीचे अध्यक्ष विलास तरंगे साहेब यांनी शुभेच्छा दिल्या व माहितीपट देवल कमिटीच्या वेबसाईटवर प्रदर्शित करू असे सांगितले , मा.आ.नमीताताई मुंदडा यांनी बोलताना सांगितले की, अंबाजोगाई शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या शहराचं ऐतिहासिक महत्त्व संपूर्ण जगामध्ये अधोरेखित व्हावं यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे आणि त्या दृष्टीनेच या ऐतिहासिक वारसा स्थळांचं जतन व्हावं संवर्धन व्हावं आणि येणाऱ्या पिढीला अभिमान वाटावा अशा पद्धतीचे काम आम्ही सुरू केलेला असून यासाठी शासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी आणून प्रत्यक्षात सर्व ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य अभाधित ठेवून नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आलेले आहे. येणाऱ्या काळातही अंबाजोगाई शहराच्या विकासात्मक दृष्टीने अनेक योजना आपल्याला प्रत्यक्षात उतरवायच्या आहेत आणि त्या दृष्टीनेच काम सुरू आहे. या कार्यक्रमासाठी योगेश्वरी देवीच्या अनेक महिला पुरुष भक्तांची उपस्थिती होती.