24/06/2025
Spread the love

मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – मराठवाडा संपर्कप्रमुख प्रकाश वेदपाठक यांचे आवाहन

अंबाजोगाई (वार्ताहर)
राज्यातील सत्ता परिवर्तन घडवून आणण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांनी पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून केज येथे रविवार, दिनांक २७ ऑक्टोबर रोजी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठवाडा संपर्कप्रमुख प्रकाश वेदपाठक यांनी केले आहे.

आमच्या प्रतिनिधीशी बोलताना प्रकाश वेदपाठक यांनी सांगितले की, राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सत्ता परिवर्तन घडवून आणण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) कटिबद्ध आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी – पाटोदा – शिरूर, बीड, गेवराई, माजलगाव आणि केज या ५ विधानसभा मतदारसंघात आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. निवडणूक लढविणार आहोत. सत्ता परिवर्तन व्हावे या दृष्टीकोनातून बीड जिल्ह्यातील केज येथे रविवार, दिनांक २७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता स्वामी समर्थ मंगल कार्यालय, धारूर रोड येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे हे असणार आहेत. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, प्रदेश संघटक कैलास जोगदंड, मराठवाडा कार्याध्यक्ष भगवंत वायबसे, मराठवाडा कार्याध्यक्ष बबन जंगले, मराठवाडा संघटक संजय तेलंग, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे (बीड) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी ऋषिकेश शिंदे (युवक जिल्हाध्यक्ष), अलकाताई साळुंखे (युवती महिला जिल्हाध्यक्ष), मदिना भाभी शेख (महिला जिल्हा उपाध्यक्ष), नासेर शेख (अंबाजोगाई तालुकाध्यक्ष), प्रमोद गाढे (शहराध्यक्ष), अजय आगळे (युवक तालुकाध्यक्ष), उमाताई गायकवाड (महिला तालुकाध्यक्ष), नवनाथ घनघाव (तालुका उपाध्यक्ष), सुनिल कांबळे (शहराध्यक्ष), कमलताई चौधरी, नसरीन भाभी गवळी यांनी पुढाकार घेतला आहे.

=======================

नोट – बातमी सोबत फोटो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
आमच्याशी संपर्क करा.