30/04/2025
Spread the love

अंबाजोगाई शहरातील नवीन मोरेवाडी येथील विद्युतनगर येथे राहणारी ऋतुजा दशरथ वेडे ही विद्यार्थीनी लातुर येथील दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात पी. जी. चे शिक्षण घेत आहे. फार्मासुटीक्स (पी. जी.) गटातून अविष्कार रिसर्च फेस्टिवल 2025 साठी इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या विषयांमध्ये तिने रिसर्च केले होते. या अगोदर लातूर जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती यामध्ये तिचा द्वितीय क्रमांक आला होता. परभणी येथील शिवाजी महाविद्यालयात झालेल्या स्पर्धेत तिने उत्कृष्ट सादरीकरण केल्याने तिचा विभागीय स्तरातून व्दितीय क्रमांक आला आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन ऋतुजा वेडे या विद्यार्थिनीचा गुणगौरव करण्यात आला होता. या विद्यार्थिनीस विभागप्रमुख तथा असिस्टंट प्रोफेसर रोहित सारडा व असिस्टंट प्रोफेसर अर्चना येलमटे यांनी मार्गदर्शन केले. तिच्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या व प्राध्यापकांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
आमच्याशी संपर्क करा.