
आजी म्हणते,
तुझ्या विना मुक घर व सुन्न झाले आंगण
वाढवू नको तुझ्या माझ्यात दरी
तुझ्या आठवणी जपून ठेवल्या बाळा
येना धावत बाळा आजीकडे
तुझी भेट माझ्यासाठी पंढरीची वारी
अशा भावना प्रबाध कवितेला रसिकांनी डोक्यावर घेतले. बेळगावच्या पूजा भडंगे, सांगलीचे रमजान मुल्ला, वर्धा अंबाजोगाईचे कवि बालाजी सुतार, शेगावचे नितीन वरणकर, परळी-वैजनाथचे संजय आघाव, पुण्याचे संगिता बर्वे, वसईच्या प्रा. सिसिलिया कार्व्हालो, अकोलाचे गोपाळ मापरी या कविंनी शेतकऱ्यांच्या जीवनाचे वास्तव दर्शन करून देणाऱ्या ऱ्हदयस्पर्शी कविता सादर केल्या. सध्या राजकीय परिस्थिती व राजकीय पक्षाचे विडंबन करणाऱ्या कवितेलाही प्रेक्षकांकडुन प्रतिसाद मिळाला. अशा बहारदार कविसंमेलनाचे प्रास्ताविक समारोह समितीचे सदस्य प्रा. भगवान शिंदे यांनी केले. सर्व कविचे स्वागत सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी केले. कवि संमेलनास रसिक प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. गुलाबी थंडीत हे रंगलेले कवि संमेलन ठरले.