Skip to content
- Home
- यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या चित्रकला स्पर्धा व बालआनंद मेळाव्यास उत्फुितर्त प्रमसाद विजयी विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग-अंबाजोगाई (वार्ताहार)-40 व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या दुसऱ्या विसाच्या कार्यक्रमाची सुरूवात शालेय चित्रकला स्पर्धा व बाल आनंद मेळाव्याने झाली. शालेय चित्रकला स्पर्धा हे समारोहातील वैशिष्ट्ये पूर्ण उपक्रम असून, या स्पर्धेत अंबाजोगाई तालुक्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. यंदा तालुक्यातील, शहरातील शाळेतील पाच हजार विद्यार्थ्यांनी रंग भरण व स्मरणचित्रे स्पर्धेत सहभाग नोंदविला. या शालेय चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. प्रथम येणाऱ्या स्पर्धकास रोख एक हजार रूपये, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय येणाऱ्या स्पर्धकास सातशे रूपये स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय येणाऱ्या स्पर्धकास पाचशे रूपये स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ येणाऱ्या स्पर्धकास रोख चारशे रूपये प्रमाणपत्र व स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात यंदाच्या बाल आनंद मेळावा व चित्रकला बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील एस. पि. महाविद्यालयाचे राजेंद्र बहाळकर, प्रमुख पाहुणे यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईचे व्यवस्थापक दत्ता बाळ सराफ व विशेष उपस्थिती वरोरा येथील आनंदवनचे प्रसिध्द धान्य रांगोळीकार प्रल्हाद ठक, परिक्षक नेताजी यादव, सचिन भोकर समितीचे कोषाध्यक्ष सतीश नाना लोमटे, सचिव दगडु लोमटे समितीचे सदस्य त्रिंबक पोखरकर व्यासपिठावर होते. कार्यक्रमाची सुरूवात पुण्याच्या प्रांजली बर्वे यांनी त्यांच्या मातोश्री संगीता बर्वे यांना लिहिलेली व त्यांचे पिताश्री राजू बर्वे यांनी संगीत बध्द केलेली तीन गाणे सादर केली.केवढी मोठी आई बाई आभाळाची पाटी चंद्र आणि चांदण्याची तरी होती दाटी या चिमण्यानो टिपा टिपा ग आगंणातले गाणे टिपता टिपता तुम्ही म्हणा ग माझ्यासाठी गाणे मराठी भाषेचे महत्त्व व जतन करण्यासाठी गाणे सादर भाषेमुळे घडतो आपण भाषेला आपण घडवावे माय मराठी भाषा आपली या भाषेचे अमृत प्यावे. यशवंतराव चव्हाणांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी आशा कार्यक्रमाची गरज आहे.दत्ता बाळु सराफ यांनी यशवंतराव चव्हाण व या कार्यक्रमाचे जनक भगवानराव लोमटे यांना विनम्र अभिवादन करीत म्हणाले हा महाराष्ट्रात साजरा होणारा एकमेव कार्यक्रम आहे. ज्यामध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यक्रम केला जातो. तेही 40 वर्षापासुन सध्या मुलासाठी गाणी, नाटक फार कमी झाले आहेत. उद्याच्या पिढीला मराठी भाषेकडे वळविण्यासाठी काम करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी स्मरणचित्रे, रंगभरण चित्रे काढण्यापेक्षा भविष्यचित्रे काढण्याची गरज आहे. याप्रसंगी प्रल्हाद ठक, नेताजी यादव यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र बवाळकर अध्यक्षीय समारोपाचे भाषण करीत विद्यार्थ्यांमध्ये जावुन त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या सोबत अभिनयासह गाणे सादर केले ते म्हणतात.युग निर्माता हम बच्चे कल की आशा हम बच्चे चलते है हम शानसे रूकते नही आंधी तुफान से उद्याच्या भविष्यासाठी शिका व खेळा खेळाच्या माध्यमातुन उपदेश व सदैव आनंदी व समाधानी राहून आई वडिलांना आनंद द्या आकर्षणाला बळी पडु नका स्वप्न व आकर्षण तपासुन पहा शक्य असलेले स्वप्न पहा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.निकाल पत्र-1) लहान गट- रंग भरणप्रथम- चि. सैमिन रघुनंदन रामदासीप्रमोदजी महाजन न्यू इंग्लीश स्कूल, अंबाजोगाईद्वितीय- कु. मानसी महेश अकोलकरस्वामी विवेकानंद बाल विद्यामंदीर, अंबाजोगाईतृतीय- कु. समृध्दी गोविंद बदानेसरस्वती पब्लीक स्कुल अंबाजोगाईउत्तेजनार्थ- 1) चि. गीत दत्ता देवकरप्रमोदजी महाजन न्यु इंग्लीश स्कुल अंबाजोगाई2) कु. आर्या रणजित लोमटेप्रमोदजी महाजन न्यु इंग्लीश स्कुल अंबाजोगाई3) कु. अदिश्री बालाजी कचरेप्रमोदजी महाजन न्यु इंग्लीश स्कुल अंबाजोगाई2) मोठा गट- स्मरण चित्रेप्रथम- कु. चैत्राली करपुडेखोलेश्वर माध्य. विद्यालय, अंबाजोगाईद्वितीय- कु. अमृता गणेश केजकरखोलेश्वर माध्य. विद्यालय, अंबाजोगाईतृतीय- कु. मृणाली किरण कुलकर्ध्णीगोदावरी कुंकूलोळ योगे. कन्या शाळा, अंबाजोगाईउत्तेजनार्थ- कु. अक्षता आण्णासाहेब हाकेजि.प. मा. शाळा पूसकु. अंजली अशोक महामुनीखोलेश्वर मा. विद्यालय, अंबाजोगाईचि. काळे रितेश लक्ष्मणजोधा प्रसाद मोदी माध्य. विद्यालय, अंबाजोगाईकार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश मेठे व पाहुण्याचा परिचय व आभार प्रदर्शन बाळासाहेब साखरे यांनी केले.