
अंबाजोगाई प्रतिनिधी :- येथील
मानवलोक समाजकार्य महाविद्यालय अंबाजोगाई येथे सत्यशोधक समाजाचे संस्थापक, थोर समाज सुधारक, क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महात्मा फुलेंच्या प्रतिमेस बार्टीचे समतादूत श्री. व्यंकटेश जोशी (धानोरकर) आणि बिभीषण घाडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. श्री व्यंकटेश जोशी (धानोरकर) यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करणारे सामाजिक गीत सादर केले. तसेच संविधान गौरव सप्ताहाच्या निमित्ताने संविधानाची उद्देशिका प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव यांना भेट दिली. यावेळी प्रा. डॉ. नजीर शेख, प्रा. डॉ. रमा पांडे, प्रा. सुकेशिनी जोगदंड, प्रा. डॉ. वनिता माने, प्रा. डॉ. किसन शिनगारे, प्रा. डॉ. हनुमंत साळुंखे, अशोक केदार, दीपक कुलकर्णी, दिपाली घोडके यांच्यासह महाविद्यालयातील कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.