
पाथर्डी फाटा, नाशिक (दि. 19): केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसद भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी आज पाथर्डी फाटा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. माहिती अधिकार जनजागृती अभियानाचे नाशिक जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संघमित्रा बुद्ध विहार बहुउद्देशीय संस्था व संघमित्रा महिला उपासिका संघाच्या वतीने तसेच स्थानिक भीम अनुयायांच्या सहभागाने हे आंदोलन झाले.आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत अमित शहा यांच्या विधानाचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
संघमित्रा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ज्योती अनिल गायकवाड, ज्योती देविदास गायकवाड, उषा तेलोरे, शीतल जगताप, निर्मला गांगुर्डे, उज्ज्वला मोरे, तेजस्विनी मानवटकर, अनिता शिरसाठ आदींसह अनेक महिला व भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी संघमित्रा महिला उपासिका संघाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा अवमान सहन केला जाणार नाही, असे ठामपणे सांगितले. या आंदोलनामध्ये नरवाडे ताई, लिलाबाई कोळे, भास्कर गवळी, शशिकांत जाधव, संजय थोरात, एकनाथ भालेराव, नितीन कोळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.आंदोलनाच्या माध्यमातून अमित शहा यांनी आपले विधान मागे घेऊन माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.