25/06/2025
Spread the love

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : तालुक्यातील ‘पाटोदा ते मोटेगाव’ या शिव रस्त्याचे सध्या सुरू असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे होत आहे. असे पंचक्रोशीतील नागरिकांचे म्हणणे आहे. तरी या प्रकरणी सदरील रस्ता कामाची खातेनिहाय चौकशी करून या कामाचा जो कोणी संबंधित ठेकेदार‌ असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व सदर कामाचे बिल मंजूर करू नये अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव सचिन फोलाने यांनी उपजिल्हाधिकारी, अंबाजोगाई यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव सचिन फोलाने यांनी उपजिल्हाधिकारी, अंबाजोगाई यांना शुक्रवार, दिनांक २० जुन रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ‘पाटोदा ते मोटेगाव’ या मार्गावर शिव रस्त्याचे सध्या सुरू असलेले डांबरीकरण व मजबुतीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्याच्या गुणवत्तेबाबत स्थानिक नागरिकांत तीव्र नाराजी आहे. केवळ वरवरचे डांबर टाकून तांत्रिक निकष आणि मानकांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे स्पष्टपणे जाणवते. निकृष्ट सामग्रीचा वापर, अपुरे बेस तयार करणे आणि आवश्यक देखरेख व गुणवत्ता चाचणी न करणे, ही गंभीर त्रुटी या कामात आढळत आहेत. या सर्व प्रकारांची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, व तोपर्यंत किंवा चौकशी पूर्ण होईपर्यंत सदर कामाचे कोणतेही बिल मंजूर अथवा वितरीत करू नये, अशी नम्र विनंती आहे. यामुळे सार्वजनिक निधीची लूट थांबवता येईल व गुणवत्तापूर्ण सार्वजनिक सुविधा नागरिकांना मिळू शकतील. अशी अपेक्षा ही सदरील निवेदनातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव सचिन फोलाने यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
आमच्याशी संपर्क करा.