08/07/2025
Spread the love

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुंबेफळच्या विद्यार्थ्यांना संगणक भेट म्हणून देण्यात आला.

‘मावळतीच्या सूर्याकडून हाच घ्यावा अर्थ, पुन्हा नव्याने उगवता येते. जर मनगटात असेल सामर्थ्य.’ या उक्तीप्रमाणे आपला एक वर्षाचा कार्यकाल संपण्यासाठी अवघे दोन दिवस राहिलेले असताना रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीचे अध्यक्ष व सचिव यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंबेफळच्या विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळविण्यासाठी शुक्रवार, दिनांक २७ जुन रोजी संगणक भेट म्हणून दिले. हा (संगणक प्रणालीचे मॉडेल आणि कॉन्फिगरेशन – डेल ऑप्टीप्लेक्स ३०४०, आय ३, ८ जीबी रॅम, २५६ जीबी एसएसडी वायफाय) व डिस्ट्रिक्ट ग्रर्न्ड ३१३२ मधून १०० शाळेला १०० संगणक देण्यात आले. यात रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीने जिल्हा परिषद शाळेचे कुंबेफळची निवड केली. रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करते. कुंबेफळ शाळेच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शिकण्याची जिद्द व शिक्षकांची शाळा व विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ पाहून रोटरी क्लबने शाळेस संगणक देऊन शैक्षणिक मदत केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका हजारे व प्रमुख पाहुणे म्हणून अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलासराव सोनवणे, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीचे अध्यक्ष कल्याण काळे, सचिव धनराज सोळंकी, कुंबेफळ गावचे सरपंच लिंगेश्वर तोडकर, माझी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व्यंकट किर्दन्त, ग्रामपंचायत सदस्य ओम यादव, हनुमंत कदम तसेच कुंबेफळ शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. या प्रसंगी रोटरीचे सचिव धनराज सोळंकी यांनी, ‘शालेय शिस्त, गुणवत्ता, सर्व उपक्रमात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग पाहून कुंबेफळच्या जिल्हा परिषद शाळेचे कौतुक केले.’ तर यावेळी गावचे सरपंच लिंगेश्वर तोडकर यांनी संगणकासाठी यूपीएस देणार असल्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती अंबुरे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार श्री.जिरगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेतील सहशिक्षक संतोष गायकवाड, डी.एम.कसबे, एम.एम.गायकवाड, श्रीमती एम.एम.तोडकर, श्रीमती एम.व्ही.मुंडे, श्रीमती एम.पी.सरवदे, श्रीमती पी.यु.जाधव, श्रीमती एन.आर.जाधव, गाताडे सर, एम.एन.गायकवाड यांनी पुढाकार घेतला.

नोट – बातमी सोबत फोटो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
आमच्याशी संपर्क करा.