17/04/2025

Year: 2024

पोलिसांना सहआरोपी करून दोन्ही प्रकरणाची सीबीआय मार्फत सखोल चौकशी करावी अंबाजोगाई (प्रतिनिधी)परभणी आणि मस्साजोग...
अंबाजोगाई (प्रतिनिधी)परभणी येथील पोलिसी अत्याचाराच्या विरोधात धार्मिक व जातीय अत्याचार विरोधी प्रतिकार समिती, अंबाजोगाई...
अंबाजोगाई – शालेय विद्यार्थ्यांनी उपस्थित असलेल्या ज्येष्ठांना गुलाब पुष्प देवून स्वागत केले व ज्येष्ठांचा...
11 व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन अंबाजोगाई – क्रांतीची बिजे ही साहित्यातूनच पुढे...
अंबाजोगाई (प्रतिनिधी)येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकिय रूग्णालयाच्या वॉर्ड ३५ मध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची...
अंबाजोगाई (प्रतिनिधी)श्री दत्त जयंतीनिमित्त मौजे पुस (ता.अंबाजोगाई) येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर येथे ९...

राष्ट्रनिर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोलाचे योगदानप्रतिनिधी- (अंबाजोगाई)6 डिसेंबर 2024स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात जवळपास 600 संस्थांने अस्तित्वात होती. ती एकत्र करून एकसंघ राष्ट्र तयार करण्याऐवजी भारत तुकड्या तुकड्यांमध्ये विभाजित होऊन या सर्वांमध्ये कायमची दुही निर्माण होईल अशी ब्रिटिशांची योजना होती . त्यातूनच त्यांनी येथील जनतेच्या व नेत्यांच्या मनात फाळणीचे विषयुक्त विचार पेरले. मात्र अशा गुंतागुंतीच्या कालखंडात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावत येथील आर्थिक समानता, सामाजिक न्याय, बंधूता इत्यादी शाश्वत मूल्यांच्या आधारावर संविधानाची निर्मिती केली आणि भारताची अखंडता टिकून टिकवून ठेवली. त्यामुळे राष्ट्रनिर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोलाचे योगदान आहे. असे प्रतिपादन इतिहासाचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांनी केले.ते येथील खोलेश्वर महाविद्यालयातील अभ्यास मंडळाच्या वतीने आयोजित महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भा. शि. प्र. संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा निवृत्त मुख्याध्यापक आप्पाराव यादव यांची उपस्थिती होती तर व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. दीपक फुलारी, व्यवसाय शिक्षण विभागाचे उपप्राचार्य डॉ. रवींद्र कुंबेफळकर, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य आनंद पाठक व अभ्यास मंडळाचे प्रमुख प्रा. गौतम गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना प्राचार्य डॉ.रोडे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय हालाखीच्या परिस्थितीत संघर्ष करीत परिस्थितीवर मात केली .त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आजही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतील असेच आहेत.संविधान आपल्या राष्ट्राचा आत्मा आहे. डॉ. आंबेडकरांनी जगातील अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून आपल्या देशाचे संविधान तयार केले आहे. सामाजिक व आर्थिक न्याय, समता, बंधुता व मानवता आदि मूल्य रुजली पाहिजेत व टिकली पाहिजेत यासाठी संविधानात त्यांचा अंतर्भाव केला. त्यामुळेच खऱ्या अर्थाने आजही आपण आपले एकसंघत्व टिकवून ठेवू शकलो आहोत. डॉ.आंबेडकरांचे जीवन म्हणजे संघर्षाची गाथाच आहे. जीवनभर त्यांना त्यांना संघर्ष करावा लागला. त्यामुळेच तळागाळातील जनतेचे दुःख ते समजू शकले व या जनतेला ते न्याय मिळवून देऊ शकले आणि ते त्यांचे उद्धारकर्ते ठरले. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी बाबासाहेबांचे संपूर्ण जीवन हे प्रेरणादायी आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.अध्यक्षीय समारोप करताना आप्पाराव यादव म्हणाली की, प्राचार्य डॉ. रोडे सरांनी त्यांच्या व्याख्यानातून बाबासाहेबांचे संपूर्ण चरित्रच आपल्यापुढे उभे केले .खरोखरच तुम्हा सर्वांसाठी ते अतिशय प्रेरणादायी आहे. यातून नक्कीच आपण प्रेरणा घेऊन पुढील वाटचाल करू असा आशावाद व्यक्त करून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आयुष्यभर संघर्ष करावा लागला. या संघर्षातून ते घडत गेले. देशात सामाजिक समता निर्माण करून त्यांनी येथील जनसामान्यांचे जीवन उंचावले म्हणूनच ते महामानव ठरले. अशा महामानवांचे विचार आपण वाचले पाहिजेत विशेष म्हणजे ते लक्षात ठेवून त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी यांनीही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. ते एक दृष्टे चिंतक होते. भारताची आज जी प्रगती आपण अनुभवत आहोत ती बाबासाहेबांच्या चिंतनाच्या अधिष्ठानावर झालेली आहे. असे मत व्यक्त करून त्यांनी बाबासाहेबांच्या ऐतिहासिक विचारांचा मागोवा घेतला.व्याख्यानानंतर भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या संगीत विभागाचे प्रमुख प्रा. शैलेश पुराणीक , प्रा. महादेव माने, कु.नंदिनी कुलकर्णी, कु. क्रांती एडके आदींनी भीम गीते सादर केली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. गौतम गायकवाड यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. जिजाराम कावळे तर आभार प्रा. डॉ.देविदास खोडेवाड यांनी मानले.कार्यक्रमाचा प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Open chat
आमच्याशी संपर्क करा.