बॅंकेच्या सर्व सभासद व ग्राहकांनी या सर्वसाधारण सभेस उपस्थित रहावे – राजकिशोर मोदी
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेच्या २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन शनिवार दि १३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या वार्षिक सर्वसाधारण सभेस बँकेच्या सर्व सन्माननीय सभासद व ग्राहकांनी उपस्थित राहण्याचे अवाहन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी , उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी व मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय देशपांडे यांनी केले आहे .
अठ्ठावीस वर्षापूर्वी अंबाजोगाई शहर व येथील नागरिकांची आर्थिक गरज लक्षात घेवून केवळ अंबाजोगाई शहरासाठी राजकिशोर मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेची सुरुवात केली होती. आज ही बँक आपल्या ग्राहकांच्या विश्वास व आर्थिक बळाच्या जोरावर १८ शाखा व दोन विस्तारित शाखांच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देत आहे . आज केवळ अंबाजोगाई शाखेत ३८ हजाराच्या वर ग्राहक व खातेदार आहेत तर बँकेच्या सर्व शाखांचे मिळून एक लाखाच्या वर ग्राहक आहेत . हे सर्व ग्राहक बँकेवर विश्वास ठेवून आपला व्यवहार या बँकेत करत आहेत.
बँकेच्या वतीने हजारो गरजवंत सुशिक्षित बेरोजगार , लहानमोठे व्यावसायिक, व्यापारी, हातगाडी व फेरीवाले यांना त्यांचा व्यवसाय व कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी कर्जाच्या स्वरूपात मदत करण्यात येत आहे . तसेच बँक वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात देखील अग्रेसर असते. बँकेने ठेविचा ६०० कोटींचा टप्पा ओलांडत वार्षिक उलाढालीत १००० कोटींचा टप्पा पार केला आहे. या वार्षिक आर्थिक उलढालीचा लेखाजोखा मांडून तो मंजूर करून घेण्यासाठी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि १३ सप्टेंबर २०२५ ,शनिवार रोजी संध्याकाळी ६:०० वाजता आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आली आहे . बँकेच्या वार्षिक सभेनंतर लगेच प्रीती भोज सभासदांसाठी आयोजित करण्यात आला आहे. याचा देखील आस्वाद घेण्याचे तसेच बँकेच्या २९ व्या आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेस सर्व सभासद मंडळींनी उपस्थित राहून बँकेस सहकार्य करावे असे आवाहन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी , उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी तसेच सर्व सन्माननीय संचालक मंडळ तथा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय देशपांडे यांनी केले आहे.
