11/05/2025
Spread the love

प्रकल्प जमिनीच्या समतल सर्वेक्षण आणि सिमांकनासाठी निघाली निविदा

अंबाजोगाई – अंबाजोगाईकरांसाठी बहुप्रतीक्षित आणि शहर विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या शासकीय औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) निर्मितीच्या दृष्टीने आ. नमिता मुंदडा यांच्या आग्रही पाठपुराव्यानंतर शासन पातळीवर वेगाने हालचाली सुरु आहेत. लवकरच अंबाजोगाई ‘एमआयडीसी’साठी काळवटी तांडा परिसरात समतल सर्वेक्षण आणि सिमांकन करण्यात येणार असून या कामाची निविदा देखील प्रकाशित झाली आहे.

अंबाजोगाई शहराचा विकास झपाट्याने होत असल्याने व या ठिकाणी बहुतांश जिल्हास्तरीय सर्व कार्यालय कार्यरत आहेत. या ठिकाणी सहकारी साखर कारखाना, सुतगिरण्या, कृषी उत्पादनावर आधारीत प्रक्रिया उद्योग, सहकारी बँका, पतसंस्था, आरोग्य विषयक सुविधा, कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्याच प्रमाणे शहरापासून लातूर येथील विमानतळ जवळ असून परळी, घाटनांदुर, लातूर येथील रेल्वे स्टेशनही जवळच आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणुकदारांच्या दृष्टीने अंबाजोगाई हे शहर सोयीचे आहे. शहरालगत मोठ्या प्रमाणावर गायरान, मोकळ्या जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे या ठिकाणी एमआयडीसी प्रकल्प उभारणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे या भागातील सुशिक्षीत, बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळवून उद्योजकांना मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. व अंबाजोगाई येथे तातडीने एमआयडीसी व्हावी यासाठी आ.नमिता मुंदडा पुढाकार घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रधान सचिव उद्योग विभाग यांच्याकडे एमआयडीसी अंतर्गत अंबाजोगाई येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी मंजूरी द्यावी अशी विनंती केली होती. तसेच, या बाबत आ. मुंदडा यांनी महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव, भूसंपादन विभागाचे महाव्यवस्थापक आणि व्यवस्थापक तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावाही केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले आणि काळवटी तांडा परिसरातील जागा ‘एमआयडीसी’साठी निश्चित करण्यात आली. हा भाग डोंगराळ असल्याने याचे समतल सर्वेक्षण करून सिमांकन करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून निविदा देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही प्रक्रिया अंबाजोगाई ‘एमआयडीसी’ निर्मितीतील महत्वाचा टप्पा असणार आहे. यानिमित्ताने शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या अंबाजोगाई शहर औद्योगिक शहर बनण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु केली आहे. एमआयडीसी मुळे या भागातील बेरोजगारांना रोजगार मिळेल व उद्योजकांना चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्ती करून आ.नमिता मुंदडा यांनी या बाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, आ. पंकजाताई मुंडे, भाजप नेत्या डॉ.प्रितमताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.

स्व.डॉ. विमलताई मुंदडा यांनीही केला होता प्रयत्न
अंबाजोगाईत एमआयडीसी व्हावी म्हणून दिवंगत मंत्री स्व.डॉ.विमलताई मुंदडा यांनी सन 2004 मध्ये वरवटी येथे पंचतारांकित एमआयडीसी मंजूर केली होती. त्यासाठी गायरान व शेतकर्‍यांची जमीन संपादन करणे आवश्यक होते. परंतु, शेतकर्‍यांनीh विरोध केल्याने सदर प्रकल्पासाठी जागा उपलब्ध झाली नाही. त्यांचे अपूर्ण स्वप्न आत त्यांच्या स्नुषा आ.. नमिता यांच्या माध्यमातून पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
आमच्याशी संपर्क करा.