
राज्य अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन
अंबाजोगाई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र बामसेफचे ३८ वे राज्य अधिवेशन या वर्षी वर्धा येथे रविवार, दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी सरोज मंगलम, राष्ट्रभाषा रोड, सानेवाडी येथे होत आहे. या महत्वपुर्ण अधिवेशनाचे अध्यक्ष बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामनजी मेश्राम हे आहेत. तर या अधिवेशनाचे उद्घाटक नागपूर येथील संविधान तज्ज्ञ देविदास घोडेस्वार हे असतील. तरी बीड जिल्ह्यातील नागरिकांनी राज्य अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे राज्य सचिव डॉ.मोहन मिसाळ व जिल्हाध्यक्ष आर.डी.वैरागे यांनी केले आहे.
सदरील अधिवेशनाची वेळ सकाळी ११ ते रात्री ९.३० पर्यंत असेल. हे अधिवेशन तीन सत्रात होणार आहे. या अधिवेशनात राष्ट्रीय, राज्य स्तरावरील ज्वलंत अशा विविध ८ विषयांवर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील २१ विद्वान,अभ्यासक वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. याअधिवेशनात सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक बाबींवर वैचारिक मंथन होणार आहे. या तिनही सत्रांची अध्यक्षता वामनजी मेश्राम हे करतील. या अधिवेशात विशेष अतिथी म्हणुन दिनकर शास्त्री भुकेले महाराज (संस्थापक अध्यक्ष, हिमगिरी प्रतिष्ठान, पुणे), शशिकांत हिंगोणेकर (प्रसिध्द साहित्यिक तथा निवृत्त (शिक्षण) उपसंचालक, जळगाव), अशोक चोपले (सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक, वर्धा) तर प्रमुख अतिथी म्हणून कुंदा तोडकर (राष्ट्रीय अध्यक्षा, रा.मु.महिला संघ, नवी दिल्ली), दीपक वासनिक (राष्ट्रीय समीक्षा, प्र.बामसेफ, नवी दिल्ली), डॉ.दयानंद गोगले (राष्ट्रीय संयोजक, आयएसएसएस, नवी दिल्ली), ऍड.राहुल मखरे (भिमा कोरेगाव चौकशी आयोग – वकील), ऍड.सुनिल डोंगरदिवे (राष्ट्रीय प्रभारी, राष्ट्रीय खिश्चन मोर्चा), बाबा हस्ते (राष्ट्रीय प्रभारी, नफ, नवी दिल्ली), डॉ.सुरेश पवार (राष्ट्रीय उपाध्यक्ष, आयएमपीए), इंजि.निशकांत जावरे (राष्ट्रीय महासचिव, आयईपीए) हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रितम प्रियदर्शी (संचालक, आवाज इंडिया टीवी, राष्ट्रीय निमंत्रक इंडिया अगेन्स्ट एवीएम.), ऍड.फिरदोस मिर्झा (सामाजिक विचारवंत, नागपुर), ऍड.स्मिता कांबळे (राष्ट्रीय समन्वयक, इंडिया अगेन्स्ट इव्हीएम फोरम), डॉ.राहुल भोईटे (भोईटे हॉस्पिटल, जवळगाव) हे सत्र पहिले – १) ईव्हीएमला रद्द करण्यात यावे. ईव्हीएम मानवाकडून किंवा एआय द्वारे हॅक होण्याची दाट शक्यता आहे. एलॉन मस्क यांचे विधान ईव्हीएमच्या द्वारे द्विदलीय, द्विदलीय संसदीय लोकतंत्राला पुन्हा स्थापित करणे आणि बहुजन समाजाला वास्तविक सत्तेपासून वंचित करणे हे शासक जातीचं एक षडयंत्र आहे – एक गंभीर चर्चा., २) संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्थान पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे बडवे ब्राह्मणांच्या हाती देण्यासाठी भाजपच्या डॉ.सुब्रमण्यम स्वामी यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेली याचिका – एक गंभीर मंथन. तसेच सत्र दुसरे – १) २०१९ च्या निवडणुकीमध्ये बीजेपी द्वारे आणि २०२४ च्या निवडणुकी मध्ये काँग्रेस द्वारा ओबीसी जनगणनेचा मुद्दा उपस्थित करणे. हे केवळ ओबीसीचा निवडणुकी मध्ये वापर करण्याचा व फक्त आश्वासन देण्याचा मामला होता. एक गंभीर विचार मंथन., ३) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० शैक्षणिक धोरण नसून मनुस्मृतीचे आधुनिक रूप आहे. एक विश्लेषण या विषयावर आपले मौलिक विचार मांडणार आहेत. तरी बीड जिल्ह्यातील तमाम बहुजन बंधु व भगिनींनी या अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन असे आवाहन बामसेफचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा.सुमित वाघमारे व राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे राज्य सचिव डॉ.मोहन मिसाळ व जिल्हाध्यक्ष रामदास वैरागे यांनी केले आहे.