16/04/2025
Spread the love

अंबाजोगाई (प्रतिनिधी ): दृष्टीकोन दिनाच्या उपक्रमात अनेक नागरिकांचा सहभाग
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक पद्मश्री डॉ. नरेन्द्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येच्या घटनेस दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी 11 वर्षे पूर्ण झाली. या प्रकरणात प्रत्यक्ष गोळी चालवणाऱ्या आरोपींना शिक्षा झाली. परंतु खूनाचे षडयंत्र रचणाऱ्या, मदत करणाऱ्या आरोपींना शिक्षा झालेली नाही. तसेच पडद्यामागील मुख्य सूत्रधारांना पकडण्यासाठी पुरावे गोळा करण्यात यंत्रणेने टाळाटाळ केली आहे असा अभिप्राय मा. न्यायालयाने दिलेल्या निकालात नोंदवला आहे.
याबाबत अंबाजोगाई शहरातील सर्व पुरोगामी विचारांच्या संघटना व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या कार्यकर्त्यांकडून लोकशाही मार्गाने निर्भय मॉर्निंग वॉक फेरीच्या माध्यमातून विवेकीपणाने व संवैधानिक मार्गाने आपला आक्रोश व्यक्त करण्यात आला.


निर्भय मॉर्निंग वॉक च्या माध्यमातून खूनाच्या मुख्य सुत्रधारांना पकडण्याचे प्रशासनाला आवाहन करण्यात आले.
अंबाजोगाई व परिसरातील सर्व पुरोगामी विचारांच्या संघटना व चळवळीचे कार्यकर्ते, नागरिक, विद्यार्थी, महिला, सर्वांनी शांततापूर्ण पद्धतीने यात सहभाग नोंदवला. SRT महाविदयालय अंबाजोगाई येथील संविधान कट्टा येथून 6.15 वाजता या मॉर्निंग वॉकची सुरुवात झाली. पुढे अण्णाभाऊ साठे चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, बस स्टँड या मार्गाने येत छ. शिवाजी महाराज चौक येथे या फेरीचा सकाळी 7 वाजता समारोप करण्यात आला. समारोपावेळी उपस्थित सर्वांसमोर प्रशासनास देण्यात येणाऱ्या विविध निवेदनांची माहिती सांगण्यात आली. सामूहिकपणे हम होंगे कामयाब हे गीत गाऊन या रॅलीचा समारोप करण्यात आला.तसेच डॉ. दाभोलकरांनी आयुष्यभर केलेल्या विज्ञानप्रसाराच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी 20 ऑगस्ट हा दिवस देशभर वैज्ञानिक दृष्टीकोन दिवस म्हणून आयोजित केला जातो. या दिवशी अंबाजोगाई शहरातील विविध शाळा-कॉलेजमधून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
आमच्याशी संपर्क करा.