
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
ग्रामविकास विभागाने दि.०७ मार्च २०२४ रोजी कनिष्ठ सहाय्यक पदांचे सेवा प्रवेश नियमांची अधिसूचना निर्गमित केल्यानुसार वाढीव पदांवर पदोन्नती प्रक्रिया, कालबध्द पदोन्नती प्रक्रियेतील दिरंगाई, राष्ट्रीय पेन्शन खात्याचा हिशोब अद्ययावत होणे व पशुसंवर्धन विभाग व शिक्षण विभागांतील कर्मचा-यांचे वेतन दरमहा ५ तारखेपर्यंत होणे, व्रणोपचारक पदांची पदोन्नती प्रक्रिया तसेच महिला कर्मचा-यांचे प्रसुती रजा व बालसंगोपन रजेची प्रकरणे विहीत मुदतीत मंजुर होणे या मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटना, जिल्हा शाखा बीड यांच्या वतीने मंगळवार, दि.२० ऑगस्ट २०२४ रोजी पासून संघटनेचे राज्यसचिव मुकुंद तुरे (राज्य सचिव, म.रा.जि.प.प.क.संघटना, सहसचिव, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी (गट-ड) कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य मुंबई, (शासन मान्यता प्राप्त) यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण व घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले होते. याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) प्रदिप काकडे यांच्या मध्यस्थीनंतर जिल्हा परिषद परिचर कर्मचा-यांचे आमरण उपोषण व घंटानाद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
याबाबत कळालेली अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटना जिल्हा शाखा, बीड यांच्या वतीने व मुकुंद तुरे राज्य सचिव (म.रा.जि.प.प.क.संघटना, सहसचिव राज्य सरकारी गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य मुंबई,(शासन मान्यता प्राप्त) यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण व घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनांच्या पार्श्वभुमीवर शुक्रवार, दि.१६ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संगितादेवी पाटील यांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर पवार, जिल्हा सचिव महेश रोकडे यांना चर्चेसाठी बोलावून परिचर संवर्गाच्या मागण्यांसंदर्भात वास्तविक परस्थिती निदर्शनास आणून दिली. जिल्हा परिषद प्रशासन आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचा विश्वास दिला व दि.०७ मार्च २०२४ रोजी ग्रामविकास विभागाने कनिष्ठ सहाय्यक पदांचे सेवा प्रवेश नियमांच्या अधिसुचनेनुसार परिचर सवंर्गाची पदोन्नती प्रक्रिया राबविली जाईल तसेच कालबध्द पदोन्नतीची प्रकरणे देखील लवकरांत लवकर निकाली काढल्या जातील असे आश्वासन देऊन सदरचे आंदोलन करू नये अशा सूचना जिल्हा कार्यकारीणीला दिल्या. त्याच बरोबर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) प्रदिप काकडे हे शुक्रवार, दि.१६ ऑगस्ट २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय कामानिमित्त गेले असल्या कारणाने त्यांनी संघटनेचे जिल्हा पदांधिकारी तसेच संघटनेचे राज्य सचिव मुकुंद तुरे यांना शनिवार, दि.१७ ऑगस्ट २०२४ रोजी सुट्टीच्या दिवशी वेळ देऊन परिचर संवर्गाच्या सर्वच मागण्यांविषयी सविस्तर चर्चा केली. त्याचबरोबर आंदोलनाचा दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोजी देखील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) प्रदिप काकडे यांनी सर्व आंदोलनकर्ते परिचर कर्मचारी यांच्याशी संवाद साधून आपल्या मागण्यांबाबत जिल्हा परिषदेचा सामान्य प्रशासन विभाग सकारात्मक असून संघटनेच्या ०७ मार्च २०२४ रोजी ग्रामविकास विभागाने कनिष्ठ सहाय्यक पदांचे सेवा प्रवेश नियमांची निर्गमित केलेल्या अधिसुचनेनुसार वाढिव पदांवर पदोन्नती प्रक्रिया, कालबध्द पदोन्नती प्रक्रियेवर दि. ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत तोडगा काढला जाईल असे आश्वासन उपस्थित ११ तालुक्यातील जवळपास २०० परिचरांसमोर दिले, त्यामुळे मंगळवार, दि.२० ऑगस्ट २०२४ रोजी ११ तालुक्यांतील जवळपास २०० परिचर कर्मचा-यांनी प्रशासनाने केलेल्या आवाहनाचा सकारात्मक विचार करून आंदोलन तात्पुरते स्थगित केले. या प्रसंगी आष्टी तालुका प्रतिनिधी योगेश वांडेकर, शिरूर तालुका प्रतिनिधी प्रल्हाद गायकवाड, गेवराई तालुका प्रतिनिधी संभाजी दहिफळे, बीड तालुका प्रतिनिधी अमोल नवले, वडवणी तालुका प्रतिनिधी व्यंकटेश गार्डी, माजलगांव तालुका प्रतिनिधी गोरख उघडे, अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी महेबूब बशीर लदाफ, परळी तालुका प्रतिनिधी बापू कावरे, केज तालुका प्रतिनिधी श्रीमती सोनाली राऊत, जिल्हा कार्यकारीणीचे अध्यक्ष परमेश्वर पवार, सचिव महेश रोकडे व कार्याध्यक्ष आत्माराम बापू गायवळ यांनी उपस्थितांसह जिल्हा प्रशासनाचे देखील आभार मानले.
=======================