17/04/2025
Spread the love

अखिल भारतीय मराठा महासंघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

अंबाजोगाई (वार्ताहर)
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईसह इतर सर्व तालुक्यात कुणबी, एसईबीसी व्हॅलिडीटी सर्टिफिकेट तात्काळ द्यावे अशी मागणी जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांनी केली आहे. याप्रश्नी त्यांनी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना बुधवार, दिनांक २१ ऑगस्ट रोजी निवेदन दिले आहे.

राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना‌ अखिल भारतीय मराठा महासंघाचे वतीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई व इतर तालुक्यात मराठा समाजाला शासनाने घोषित केलेल्या कुणबी व एसईबीसी व्हॅलिडीटी सर्टिफिकेट देण्यासाठी बीड येथील समाजकल्याण कार्यालय, बीड येथील कर्मचारी मुद्दामहून वेळ लावत असल्याचे दिसून येत आहे. याचा फटका सध्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना (ऍडमिशन) व इतर सीईटी, जेईई आणि नीट सारख्या शैक्षणिक परीक्षा व आवश्यक कामांसाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. समाजकल्याण कार्यालय, बीड येथे जाऊन मराठा समाजातील एखाद्या विद्यार्थ्याने विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळत नाही. किंवा मराठा समाजातील असल्याने पुर्वग्रह ठेवून वागणूक दिली जात आहे. राज्य शासनाने एसईबीसी व्हॅलिडीटीला सहा महिन्यांचा अवधी दिला असला तरी विद्यार्थ्यांना लवकरात लवकर व्हॅलिडीटी सर्टिफिकेट मिळावे. यासाठी कर्मचाऱ्यांचे सहकार्य असावे. परंतु, सदरील समाजकल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे कोणत्याही प्रकारची मदत व सहकार्य करीत नाहीत. तसेच एनआयसी, बीड येथून मराठा समाजाला मिळालेले कुणबी पुरावे तपासून वेबसाईटवर अपलोड करण्यास दिरंगाई होत आहे. त्यामुळे महसूल, समाजकल्याण कार्यालयात आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ, तंत्रज्ञ तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावेत. जात पडताळणी समिती सक्षम कराव्यात. राज्यासह बीड जिल्ह्यातील जात पडताळणी समित्यांना नियमित व पुर्ण वेळ अध्यक्ष उपलब्ध करून देण्यात यावेत. जात पडताळणी (व्हॅलिडीटी) चा सहा महिन्यांचा कालावधी कमी करण्यात यावा. व तात्काळ पडताळणी करण्यात येवून प्रमाणपत्र देण्यात यावे. तरी या प्रकरणी तात्काळ लक्ष देऊन मराठा समाजातील विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा, या समस्या सोडवाव्यात अशी विनंती व सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी बीड यांना देण्यात आली आहे. सदरील निवेदनावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण, पत्रकार रमाकांत पाटील, बीड जिल्हा प्रसिध्दीप्रमुख रणजित डांगे, पांडुरंग देशमुख, ऍड.बापू मोरे, विजय चव्हाण, ओमकार चव्हाण, लहू शिंदे आदींसह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

=======================

नोट – बातमी सोबत निवेदन व फोटो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
आमच्याशी संपर्क करा.