
रोटरी क्लब, क्रेडाई, बागवान बिरादरी पंचकमीटी, काझी सेवा संघ यांच्या वतीने नागरी सत्कार
अंबाजोगाई :- वक्फ बोर्डाच्या माध्यमातून समाजातील वंचित व उपेक्षित यांच्यासाठी विविध योजना राबवून त्यांना न्याय देण्या बरोबरच वक्फ बोर्डाचा दर्जा उंचावण्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम करू. अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे नवनिर्वाचित सदस्य समीर गुलामनबी काझी यांनी दिली.
अंबाजोगाईत बुधवारी आद्यकवी मुकुंंदराज सभागृहात रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी ,क्रेडाई,बागवान बिरादरी पंचकमीटी, काझी सेवा संघ यांच्या वतीने वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना समीर काझी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र क्रेडाईचे
अध्यक्ष प्रमोद खैरनार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून रोटरीचे माजी प्रांतपाल ओमप्रकाश मोतीपवळे, बागवान एज्युकेशन सोसायटीचे सचिव हाजी नसीर अहेमद खलिफा, काझी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष मोहंम्मद शफि गुलामनबी काझी, के्रडाईचे महाराष्ट्र सचिव डॉ.धर्मविर भारती, रोटरी क्लबचे अध्यक्ष कल्याण काळे, सचिव धनराज सोळंकी,क्रेडाई
अंबाजोगाईचे अध्यक्ष संजय सुराणा, सचिव शेख शकील बागवान, अतुल संघाणी, अनंत लोमटे, प्रा.संतोष मोहिते उपस्थित होते.
यावेळी बोलताना समिर काझी म्हणाले की, आपण वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदाचा पदभार घेतल्यापासुन २० कोटी रूपयांचा निधी शासनाकडून बोर्डासाठी प्राप्त केला आहे. बोर्डाच्या माध्यमातून २७ जिल्ह्यामध्ये मंडळाची जिल्हा कार्यालये उघडण्यात येत आहेत. मंडळाच्या रेकॉर्ड रूमचे आधुनूकीकरण करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आमखास मैदानात १०० कोटी रूपयांचे अंतरराष्ट्रीय स्टेडीअम बनविण्यासाठी माझा पुढाकार राहिल. तर वक्फ बोर्डाचे मेडीकल कॉलेज निर्माण करण्यासाठी माझा प्रयत्न राहिल. वक्फ बोर्डाच्या माध्यमातून समाजातील विधवा स्त्रीया, गरीब विद्यार्थी यांच्यासाठी विविध योजना तरूण उद्योजकांना भांडवल देण्याचा प्रस्ताव विचाराधिन असल्याचे समीर काझी यांनी यावेळी सांगितले. अध्यक्षीय समारोप प्रमोद खैरनार यांनी केला. तर यावेळी ओमप्रकाश मोतीपवळे, हाजी नसीर अहेमद खलिफा, मोहम्मद शफी गुलामनबी काझी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी
समीर काझी यांचा नागरी सत्कार शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व स्मृती चिन्ह देवून करण्यात आला. सन्मानपत्राचे वाचन अतुल संघाणी यांनी केले. या कार्यक्रमात नीट परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय सुराणा यांनी केले. संचलन संतोष पवार यांनी, तर उपस्थितांचे आभार शेख शकील बागवान यांन मानले.
या कार्यक्रमास नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.