
संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ हे समाज परिवर्तनाचे माध्यम असून शैक्षणिक केंद्राबरोबर शिक्षण आणि समाज प्रबोधनाचे माध्यम म्हणून ओळखले जाते ..शिक्षण सर्वांना मिळाला पाहिजे शिक्षणाने सर्व विकास साध्य होतो.. या विद्यापीठात् हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत सध्या अनेक संधी शिक्षण क्षेत्रात या विद्यापीठात असल्याचे प्रतिपादन सावरकर महाविद्यालयाचे डॉ. सचिन कंदले यांनी केले.. खोलेश्वर महाविद्यालयाच्या विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त अभ्यास मंडळांने आयोजित केलेल्या भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर ते बोलत होते.. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष तथा केंद्रीय कार्यकारणी सदस्य श्री. रामभाऊ कुलकर्णी तसेच महाविद्यालयीन विकास समिती सदस्य डॉ. प्रवीण जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी आधीची मंचावर उपस्थिती होती.. पुढे बोलताना डॉ. सचिन कंदले यांनी विद्यापीठ वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन ,मराठवाडा विद्यापीठ नामांतरण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देऊ नावलौकिक करण्याचं काम केलं आहे.. हे विद्यापीठ समाज परिवर्तनाचे माध्यम आहे असेही पुढे त्यांनी सांगितलं तसेच या विद्यापीठात विविध अभ्यासक्रमाची ओळख करून दिली… तसेच या विद्यापीठात शिक्षण क्षेत्रात अनेक संधी असल्याचं त्यांनी सांगितलं… अध्यक्षीय समारोपात रामभाऊ कुलकर्णी यांनी प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.. तसेच ज्ञान किती पवित्र आहे हे ज्ञान विस्ताराने पुढे नेण्याचे काम प्राध्यापकाने केलं पाहिजे तसेच या विद्यापीठात अनेक मोठे उद्योजक, शिक्षण तज्ञ, निर्माण केले आहे असेही त्यांनी सांगितले.. प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी यांनी इतिहास अभ्यास मंडळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले. मराठवाड्याचे मागासले पण दूर व्हावे यासाठी या विद्यापीठाची स्थापना झाली त्यामधून अनेकांना शिक्षणाची संधी प्राप्त झाली .. उच्च शिक्षणासाठी हे विद्यापीठ अतिशय चांगले आहे शैक्षणिक क्षेत्रात सध्या अनेक संधी असून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात या विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा निर्माण केल्याचेही त्यांनी सांगितले.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कावळे आभार प्रा. गौतम गायकवाड यांनी मांडले शांती मंत्र उपप्राचार्य डॉ. दिगंबर मुडेगावकर यांनी म्हंटला आणि कार्यक्रमाची सांगता झाली.. प्रारंभिक मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले संगीत विभागाने विद्यापीठ गीत गायन केले.