
पालखी सोहळ्याने आराधना महोत्सवाची यशस्वी सांगता
अंबाजोगाई (प्रतिनिधी)- श्रीमद् राघवेंद्र स्वामी महाराज यांचे विचार कार्य समाजाला दिशा देणारे असून हे कार्य भक्तांनी जोपासावे असे आवाहन ज्ेष्ठ साहित्यिक गणपत व्यास यांनी केले. मला मिळालेला पुरस्कार माझ्या दृष्टीने मोलाचा आहे. कै.रा.ज.संदीकर यांनी धार्मिक विचारांना गतीमान केले. असे त्यांनी यावेळी सांगितले.
तीन दिवसीय आराधना मोहोत्सवात व्यास बोलत होते की, रा.ज.संदीकर स्मृती पुरस्कार व्यास गुरूजी यांना प्रदान करण्यात आला. तर वै.चामनाचार्य जोशी स्मृती पुरस्कार श्रीराम प्रभाकरराव रामदासी (बिटरगावकर) यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी झालेल्या सत्काराला उत्तर देताना व्यास गुरूजी यांनी श्रीमद् राघवेंद्र स्वामी महाराज यांच्या विचार कार्याची माहिती उपस्थितांनासमोर मांडली. तर श्रीराम रामदासी यांनी वामनाचार्य जोशी यांच्या विचार कार्यांची माहिती भक्तांसमोर मांडली. त्यांच्या विचारांमुळेच मला कार्याची प्रेरणा मिळाली. असे त्यांनी यावेळी सांगितले. गणपत व्यास गुरूजी, श्रीराम रामदासी यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी व्यास गुरूजी यांनी श्रीमद् राघवेंद्र स्वामी महाराज यांच्या जीवन कार्यावर गीत सादर केले. सर्वश्री कृष्णराव भोकरे, चौथवे गुरूजी, प्रा.डॉ.अलका तडकलकर आदींनी आपले विचार व्यक्त केले. मिलींद कर्हाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.अर्चना जोशी यांनी केले. तर सर्वश्री धोंडोपंत चिंचोलकर, अशोकराव जोशी, शेषाद्रीचार्य पिंपळे, श्रीपाद सुधाकर कुलकर्णी, मिलींद कर्हाडे, यतिंद्र कर्हाडे, श्रीपाद कुलकर्णी, सचिन पुराणिक, जयंत हामिने,अनिल तेलंग, श्रृती पुराणिक, विनाया पत्की, प्रा.अर्चना कुलकर्णी, विजयाताई व्यास, रजणी रामदासी कुलकर्णी, धनश्री कर्हाडे, मुकुंद कर्हाडे, योगेश्वरी वधु-वर सुचक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर सेलमुकर, ज्येष्ठ पत्रकार विजय हामिने, मनोज काटे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या तीन दिवसीय आराधना महोत्सवाची सांगता पालखी सोहळ्याने झाली. पालखी सोहळा हा तीन दिवसीय आराधना महोत्सवात आकर्षक ठरला.