
अंबाजोगाई (प्रतिनिधी) – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, अंबाजोगाई व केज शहरांमध्ये शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
उपजिल्हाप्रमुख गजानन मुडेगावकर यांच्या कार्यालयात 24 ऑगस्ट रोजी या अभियानाला सुरुवात झाली.शिवसेना जिल्हा प्रमुख सचीन मुळुक यांच्या नेतृत्वाखाली आणि मराठवाडा संपर्क नेते अर्जुन खोतकर, जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे आणि शहर प्रमुख ऋषिकेश लोमटे यांच्या सहकार्याने हे अभियान यशस्वीरित्या सुरू झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मुडेगावकर यांनी सदस्य नोंदणीला प्राधान्य दिले असून, ‘माझी लाडकी बहीण’ योजनेद्वारे शेकडो महिलांना मार्गदर्शन देण्याचे कार्य त्यांनी यापूर्वीच केले आहे. शिवसेना आणि गजानन मुडेगावकर यांचे अतुट नाते असून, केज मतदारसंघात शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्न सर्वश्रुत आहेत, अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.