22/06/2025
Spread the love

मागील कित्येक महिन्यापासून अंबाजोगाई शहरात कर्णकर्कश हॉर्न, फॅन्सी नंबर प्लेट आणि नवीन युवकांची बुलेट चे सायलंसर याने नागरिक पूर्ण त्रस्त झाले होते. काही हृदय रोगी वयोवृद्ध नागरिकांना रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागले आहेत. सामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे माध्यमांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून आवाज उठविला होता. याची दखल घेत पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी थेट बीड येथील वाहतूक शाखेच्या पथकाला सूचना केल्या नंतर अंबाजोगाई शहर व ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त मोहिमेने 26 बुलेट चे सायलंसर, फॅन्सी नंबर प्लेट व कर्णकर्कश आवाज असणारे हॉर्न असे मिळून 180 वाहनधारकांवर कारवाई करत त्यांच्याकडून 1 लाख 30 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाई मुळे वाहनधारकांना चांगलाच चाप बसणार आहे.

बीड वाहतूक पोलीस शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप , पोलिस उपनिरीक्षक हणुमंत घोडके, पवार, वाहतूक पोलीस बजरंग ठोंबरे, नारायण दराडे, नितीन काकडे, आर. टी. पवार, आदिनाथ मुंडे, वसीम शेख, अरुण राऊत, त्रिंबक फड , महिला पोलिस गायकवाड, बालासाहेब पारवे, ,मधुकर रोडे , राधा काळे, दिपाली बोंडले या वाहतूक पोलिसांनी संयुक्त मोहीम राबविली

180 वाहनांवर कारवाई केली म्हणजे मोहीम संपली नव्हे

अंबाजोगाई शहरात बीड वाहतूक पोलीस शाखेचे पथक आठ दिवसातून एकदा येऊन अश्या कारवाया करणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होत असलेल्या वाहनधारकांवर कारवाई केली जाणार आहे.कारवाईची मोहीम संपली असे वाहनधारकांनी समजू नये – सुभाष सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा बीड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
आमच्याशी संपर्क करा.