
अंबाजोगाई – महाविकास आघाडीमध्ये एकत्रित निवडणूका लढताना बीड जिल्ह्यात केज, गेवराई व माजलगाव हे तीन मतदार संघ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे द्यावेत अशी मागणी आम्ही वरिष्ठ पातळीवर केली आहे. त्या दृष्टीने या तीन्ही मतदार संघात आमची तयारी सुरू आहे. असे शिवसेनेच्या उपनेत्या सुष्मा अंधारे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
अंबाजोगाई येथे शुक्रवारी रात्री शिवसेनेची स्त्री-शक्ती व गटप्रमुख संवाद दौर्याची आयोजन करण्यात आले होते. आद्यकवी मुकुंदराज सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी आपल्या भाषणात सुष्मा अंधारे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड संपर्क प्रमुख परशुराम जाधव, जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे, परमेश्वर सातपुते, संपदा गडकरी, उपजिल्हाप्रमुख शिवाजी कुलकर्णी, तालुका प्रमुख बालासाहेब शेप, डॉ.नयना सिरसाट, अशोक हेडे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सुष्मा अंधारे म्हणाल्या की, लोकसभेत ज्या प्रमाणे आम्ही एकत्रित लढून बीड जिल्ह्यात आमची ताकद दाखवून दिली. तीच ताकद विधानसभा निवडणूकीतही दाखविली जाईल. बीड जिल्ह्यात केज, गेवराई, माजलगाव हे तीन मतदार संघ शिवसेनेने मागीतले आहेत. महाविकास आघाडीत ही मागणी मान्य होईल. असे अंधारे म्हणाल्या. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यावर जोरदार टिका केली.