
अंबाजोगाई:- मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे पत्रान्वये दिनांक १७.०९.२०२४ ते ०२.१०. २०२४ या पंधरवडयात “स्वच्छता ही सेवा २०२४ (SHS-2024)” ही राष्ट्रीय माहीम राबविण्यात येत असून सदर SHS-2024 ची थीम “स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता” आहे. करिता, या मोहीममध्ये सर्वांनी उत्साहाने सक्रिय सहभाग नोंदविण्याबत कळविले होते
त्यानुसार येथील जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय परिसर येथे दि.२६/०९/२०२४ सकाळी ८-०० वाजता स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी अंबाजोगाई येथील मा.श्री.दीपक खोचे साहेब, जिल्हा न्यायाधीश-१ व मा.संजश्री घरत मॅडम जिल्हा न्यायाधीश-२, दिवाणी न्यायालय, व. स्तर,मा.श्री.एम.वाय. वाघ साहेब व मा.श्री. पी.आर. वाघडोळे साहेब, सह दिवाणी न्यायालय, क. स्तर मा.श्री. एस.डी. मेहता साहेब,मा.श्री. बी. एन. गोडबोले साहेब वकील संघाचे अध्यक्ष अँड.जयंत भारजकर, उपाध्यक्ष अँड.माणिक आदमाने, सचिव अँड.सचिन शेप, सहसचिव अँड.शहाजहान पठाण, सरकारी वकील अँड.डी.एम.फड, माजी सरकारी वकील अँड.अशोक कुलकर्णी तसेंच नगर परिषद स्वच्छता निरीक्षक श्री.अनंत वेडे, अंबाजोगाई येथील वकील संघाचे सदस्य व न्यायालयीन कर्मचा-यांनी व नगर परिषद कर्मचारी यांनी स्वछता अभियानात सहभाग घेऊन न्यायालय परिसर स्वच्छ केला.
यावेळी नगर परिषद व न्यायालयातील स्वच्छता कर्मचारी यांचे मा.न्यायाधीश व वकील संघाचे पदाधिकारी यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
नोट:- सोबत फोटो पाठवले आहेत