
प्रा. डाॅ. शैलजा बरुरेंचा सत्कार, नवरात्र उत्सवात महिलांचा सन्मान
अंबाजोगाई, दि. ४ (प्रतिनिधी) येथील स्वाभिमान संघटनेच्या वतीने नवरात्र उत्सवात ९ दिवस विविध समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याचे ठरवले होते. त्यानुसार गुरुवारी (ता.३) प्रा. डाॅ. शैलजा बरुरे यांचा सन्मान केला.
या सन्मानाचे स्वरूप शाल, फेटा व योगेश्वरी देवीची प्रतिमा असे होते. पत्रकार प्रशांत बर्दापूरकर यांच्या हस्ते प्रा. डॉ. शैलजा बरुरे यांचा हा सन्मान करण्यात आला. यावेळी स्वाभिमान संघटनेचे पदाधिकारी मनोज कदम यांच्यासह त्यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सन्मान मातेचा, स्त्री शक्तीचा, सन्मान स्त्री कर्तृत्वाचा असा हा उपक्रम या संघटनेचा आहे. प्रा. डाॅ. शैलजा बरुरे यांचे शैक्षणिक क्षेत्रात असलेले योगदान आणि विद्यार्थी घडवण्याबरोबरच व्याख्यानातून मांडलेल्या विचारातून समाज जागृती होत आहे. एक महिला असूनही डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध पदावर त्या कार्यरत आहेत. योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात त्या राज्यशास्त्र विभाग प्रमुख आहेत. अशा या कर्तृत्ववान महिलेचा आम्ही पहिला सत्कार केल्याचे मनोज कदम यांनी सांगितले.
फोटो, ओळी : अंबाजोगाई, प्रा. डाॅ. शैलजा बरूरे यांचा सत्कार करताना प्रशांत बर्दापूरकर, मनोज कदम यांच्यासह मित्र परिवार.