
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
श्री योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित,श्री योगेश्वरी क्रीडा प्रबोधिनीच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांचे १२१ व्या जयंती निमित्त आयोजित “शालेय एकेरी खुल्या बॅडमिंटन” स्पर्धेसाठी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर, उपाध्यक्ष गणपत व्यास कार्यकारी उपाध्यक्ष ऍड जगदीश चौसाळकर, सचिव कमलाकर चौसाळकर कोषाध्यक्ष डॉ.शैलेश वैद्य,संचालक आर.व्ही.सोनवळकर तर उद्घाटक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील शरीर रचनाशास्त्र विभाग प्रमुख डॉ.सिध्देश्वर बिराजदार आदींच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले.
डॉ.बिराजदार यांनी आपले वडील वीरभद्रप्पा बिराजदार, व आई सौ.गुराम्मा वि. बिराजदार यांच्या स्मरणार्थ १४ वर्ष व १७ वर्ष विजयी मुले ५५१ रुपये, व मुली ५५१ रुपये रोख रक्कम देण्यासाठी संस्थेकडे सुपूर्द केली.
विद्यार्थ्यांच्या जीवनात जीवघेणी स्पर्धा आहे, ती त्याच्या करिअरसाठी त्याचा आणि पालकांच्या दृष्टीने महत्वाची आहे पण
शाळेतील मुलां,मुलींना ( विशेष करून १४ वर्षा खालील ) आनंदरूपी स्पर्धेचा आणि खेळाचा आनंद घेता यावा त्या निमित्याने मुलाचा, मुलींचा मैदानावरच्या खेळामध्ये सहभाग वाढवा ” लहानपणीच्या आठवणी कायम स्मरणात राहतील आणि या वयात खेळला तर आरोग्य निरोगी राहील असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात ९९ मुलांनी ५६ मुलींनी, तर १७ वर्ष वयोगटात ५९ मुलांनी आणि ०७ मुलींनी असे एकूण २२१ मुला मुलींनी स्पर्धेत सहभाग घेतला विजेत्या स्पर्धकांना पू.स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंती निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.