
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या वतीने महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता मोहीम राबविण्यात आली याप्रसंगी नवरात्र उत्सव निमित्त,श्री योगेश्वरी देवी मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली.
या शिबिरामध्ये रोटरी क्लब सोबत सर्व सामाजिक संघटना सामील झाल्या होत्या अंबाजोगाई नगर परिषद, वसुंधरा प्रतिष्ठान, रोट्रॅक्ट क्लब, इनरव्हील क्लब, कृषी महाविद्यालय, सरस्वती गणेश मंडळ, व इतर सामाजिक कार्यकर्ते सामील झाले होते.
या कार्यक्रमासाठी आ नमिता मुंदडा,नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे, स्वच्छता अभियान निरीक्षक अनंत वेडे तसेच रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी चे सर्व सदस्य उपस्थित होते.