
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
खोलेश्र्वर प्रा.विद्यालयाच्या प्रगती विभागात शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने कुमारीका पुजन कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.
विविध सणांपैकी शारदीय नवरात्रोत्सव हा नऊ दिवसाचा उत्सव आहे.
याचा उल्लेख भारतीय ग्रंथ पुराणात आढळून येतो
देवीची उपासना म्हणेज स्त्री शक्तीची उपासना आणि विशेष म्हणजे स्त्रीशक्तीचे सक्षमीकरण मातृसत्ताक कुटूंब पद्धतीच्या काळात हा उत्सव सुरू झाला
नऊ दिवस पुजन…. ती माता आहे ती सृजनशिल आहे ती जगत जननी आहे तिला वारंवार वंदन केले पाहीजे नवरात्रोत्सव हा सर्वोच्च स्त्री शक्तीउत्सव होणे अपेक्षित आहे
आजमितीला स्त्रीला सर्व लिंगभेदास पलीकडे जाऊन समानतेचे स्थान देणे गरजेचे आहे. हे महत्व जाणून
याच धर्तीवर या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यालयातील विद्यार्थिनीं कुमारीकेचे पुजन करुन त्यांना भेटवस्तू देण्यात आली. भाशिप्र संस्थेच्या संचालिका डॉ कल्पना चौसाळकर,राष्ट्रसेविका समितीच्या नभा वालवाडकर, विभाग प्रमुख वर्षा मुंडे यांच्यासह इतर शिक्षिका उपस्थित होत्या.