25/06/2025
Spread the love

ऑल इंडिया पँथर सेनेचा इशारा

अंबाजोगाई (प्रतिनिधी) केज तालुक्यातील जीवाचीवाडी तांडा ते जीवाचीवाडी गाव रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार करणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता स्वामी तर उपविभागीय अभियंता मळेकर (केज) व कंत्राटदार यांनी इस्टीमेट प्रमाणे काम न करता भ्रष्टाचार करण्याचे उद्देशाने निकृष्ठ दर्जाचे काम केले असल्याने अधिक्षक अभियंता गुणनियंत्रण विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत चौकीश करून गुन्हे दाखल करावेत. या मागणीसाठी ऑल इंडिया दलित पँथर सेनेने उपविभागीय अधिकारी कार्यालय अंबाजोगाई या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून मागणी मान्य होईलपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. अशा इशाराही ऑल इंडिया पँथर सेनेने दिला आहे.

बुधवार, दि. 9 ऑक्टोबर 2024 रोजी पासुन उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांच्या कार्यालयासमोर वरील मागणीसाठी ऑल इंडिया दलित पँथर सेनेने आमरण उपोषण सुरू केले असून त्याचा आज तिसरा दिवस आहे. जीवाचीवाडी तांडा ते जीवाचीवाडी गाव रस्ता कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 4 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. सदरील कामाचा कंत्राटदार , कार्यकारी अभियंता अंबाजोगाई, स्वामी उपविभागीय अधिकारी मळेकर यांनी संगणमत करून इस्टीमेट प्रमाणे काम न करता केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी सदरील कामात निकृष्ट दर्जात खडी व इतर साहित्य वापरले असून उपविभागीय अभियंता यांच्याकडे माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती मागूनही संबंधीत कार्यालयाकडून कसल्याची प्रकारची माहिती मिळालेली नाही. संबंधीत कामाची सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन कार्यालय मंत्रालय येथे तक्रार देवूनही संबंधीत कामाची चौकशी अद्यापपर्यंत झालेली नाही. परिणामी अधिक्षक अभियंता गुणनियंत्रक विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून तात्काळ संबंधी कामाची चौकशी करून जोशी अभियंता व कंत्राटदार यांच्याकडून नियमानुसार कार्यवाही करावी. अशी मागणी ऑल इंडिया दलित पँथर सेनेने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
आमच्याशी संपर्क करा.