
उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, आंदोलनाचा इशारा
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी भुमीहीन शेतमजुर व श्रावणबाळ योजना यातील लाभार्थ्यांची पिळवणूक थांबवा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. याप्रश्नी गुरूवार, दिनांक १० ऑक्टोबर रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. तसेच ८ विविध मागण्यांचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. याबाबत तात्काळ कार्यवाही झाली नाही तर पुढील काळात आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांनी दिला आहे.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी भूमीहीन शेतमजुर योजना व श्रावणबाळ योजना यात अनेक दिवसांपासून व अनेक वर्षांपासून या लाभार्थ्यांचे अर्ज पडून असतात. परंतु, त्या अर्जावर लवकर कार्यवाही होत नाही. तरी त्या अर्जावर लवकर कार्यवाही करावी तसेच या योजनेतील फाईल धुळखात पडलेल्या असतात अर्जदारास कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. अर्जदार हा अनेक वेळेस आपल्या कार्यालयात येवून हेलपाटे मारतो. परंतु, त्याला योग्य न्याय दिला जात नाही. अर्जदार जेव्हा कार्यालयात जावून त्यांची फाईल मंजुर झाली की, नाही त्याला उत्तर मिळते अजुन मिटींग झाली नाही. तरी या लाभार्थ्यांच्या प्रकारणांची योग्य माहिती घेवून त्यांना न्याय द्यावा तसेच त्यांच्या पुढील मागण्या मान्य कराव्यात. मागण्या अशा १) दिव्यांग व विधवा महिलांचा अंत्योदय अन्न योजनेत समावेश करावा, २) संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी भुमिहिन शेतमजुर व श्रावणबाळ योजनेतील लोकांना ६ हजार रूपये महिना पगार करावा, ३) संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी भुमिहीन शेतमजूर व श्रावणबाळ योजनेच्या लोकांचा दर महिन्याला पगार करावा, ४) इंदिरा गांधी शेतमजुर भुमिहीन शेतमजुर व श्रावण बाळ योजनेच्या लोकांचे वय ६६ वर्षांवरून ५० वर्षे करावे, ५) डीआरडी उत्पन्नाची मर्यादा वाढवून त्याचे वार्षिक उत्पन्न ७५ हजार इतके करावे, ६) दिव्यांगांना शासनाने बँक कर्जावर ५० टक्के सबसीडी द्यावी, ७ ) १२ बलुतेदार लोकांना विश्वकर्मा प्रधानमंत्री योजनेची अमंलबजावणी करावी आणि ८) पंतप्रधान घरकुल योजना, इंदिरा आवास घरकुल योजना, रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, मोदी आवास घरकुल योजना या घरकुल योजनांची १ लाख ३८ हजारावरून मर्यादा वाढवून २ लाख ५० हजार करावे या मागण्या मान्य कराव्यात. असे नमूद केले आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी १) शहर पोलीस स्टेशन व २) तहसिलदार, अंबाजोगाई यांना देण्यात आलेल्या आहेत. सदरील निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे, जिल्हा उपाध्यक्ष, परमेश्वर मिसाळ, जिल्हा सचिव नारायणराव मुळे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष केशव टेहरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अश्विनी यादव, तालुकाध्यक्ष सुनंदा लोखंडे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सिद्राम यादव, विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष सतिश कुंडगर, ऍड.माधव जाधव, ऍड.पी.जी.शिंदे, दत्तू सरवदे, इराप्पा सरवदे, अनंत फेटे, बळीराम शेळके, शरद भांडवलकर, सुरेश लोखंडे, रामराव पाडुळे, महेश सातपुते, अण्णासाहेब देशमुख, हरिबाई माचवे, बालिकाबाई वेदपाठक, विजाबाई सरवदे, गंगाबाई मुळे, मैनाबाई साखरे, उषा सरवदे, गंगाबाई सरवदे, प्रभावती कदम, अनुसया पाडुळे, वनारसीबाई पाडुळे, द्रौपदी सरवदे, शेषाबाई सरवदे, ईराप्पा पाडुळे, ऍड.डी.आर.गोरे, ऍड.पी.आर.कासारे, दैवशाला वाघमारे, दोडीराम साखरे, रामभाऊ बुरशे, अनुसया लोखंडे, राजश्री लोखंडे, सुधाकर पन्हाळे, बाबु वलीखाॅं पठाण, खाजा चांदसाब शेख, अशोक पालके, आशा जोगदंड, सुनिता पाडुळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. संभाजी ब्रिगेडच्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, श्रमजीवी, कामगार, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
=======================