विश्वशांती बुद्ध विहार उदगीर येथे डिव्हिजन ऑफिसर विलास आल्टे यांचा सत्कारपोलीस मित्र सोशल असोसिएशन च्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल पू. भिक्खू नागसेन बोधी उदगीर, पू. भिक्खू कश्यप उदगीर व आमचे स्नेही बंधूमित्र शिक्षक आयु. माधव कांबळे कल्लूरकर सर यांनी संविधान आपले हा ग्रंथ देऊन माझा यथोचित मानसन्मान केला माझ्यासोबत माझी पत्नी सुनीता आल्टे, मुलगी निशिगंधा आल्टे व गौतमी आल्टे हेही उपस्थित होते.माझा सत्कार केल्याबद्दल मान्यवरांचे मनापासून हार्दिक आभारतसेचभारताच्या महामहीम राष्ट्रपती आद. द्रौपदी मुरमुजी मॅडम यांच्या हस्ते काही दिवसापूर्वी उद्घाटन झालेले मराठवाड्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील देखणी बुद्ध विहार या बुद्ध विहाराची ज्यांनी संकल्पना मांडली आणि ती पूर्णत्वात उतरवली असे राज्याचे क्रीडा व युवा कल्याण मंत्री माननीय नामदार संजय जी बनसोडे साहेब यांच्या अतंग परिश्रमातून निर्माण झालेले विश्वशांती बुद्ध विहार खरोखरच डोळ्याचे पारणे फेडणारे आहे अतिशय भव्य दिव्य या विहारांमध्ये तथागत बुद्धांची मूर्ती बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही मूर्ती आणि तळमजल्यात ध्यानधारणा केंद्राची निर्मिती पाहून मन कसं प्रसन्न झाले आणि प्रफुल्लित झाले खरोखरच माननीय नामदार संजय जी बनसोडे साहेब यांच्या सारखे प्रत्येक जिल्ह्याला कर्तबगार व कार्य कुशल दूरदृष्टीचे नेतृत्व मिळाल्यास समाजाचा आणि पर्यायने देशाचा विकास होण्यास काहीच वेळ लागणार नाही म्हणून माननीय नामदार संजयजी बनसोडे साहेब यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत लातूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच बुद्धीजम पर्यटन केंद्र उदगीर येथे निर्माण झाले आहे हे विहार पाहण्यासाठी लातूर जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून बौद्ध उपासकांसह इतर धर्मीय नागरिक देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहत आहेत.विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन झाल्यापासून आपणही सहकुटुंब या बुद्ध विहाराला भेट द्यावी अशी मनोकामना निर्माण झाली होती. म्हणून रविवार दिनांक 13 ऑक्टोंबर 2024 रोजी सहकुटुंब विहार पाहण्यासाठी जाण्याचे निश्चित केले. आणि चळवळीतील आमचे स्नेही मित्र शिक्षक आयु. माधव कांबळे, कल्लूरकर सर, समता सैनिक दलाचे डिव्हिजन ऑफिसर तथा जिल्हा सचिव आयु. कमलाकर सांगवीकर सर यांना फोन करून आम्ही उदगीरला येत आहोत विहार पाहण्यासाठी विहार आज पाहता येईल का असे विचारणा केल्यानंतर दोन्ही सन्माननीय बंधू म्हणाले की तुम्ही या सर व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त या ठिकाणी अनपेक्षित उपासकांची उपस्थिती होती म्हणजेच या कार्यक्रमासाठी दोन चार हजार लोक आजूबाजूच्या जिल्ह्यातून उपस्थित राहतील अशी व्यवस्था संयोजकांनी या ठिकाणी केली होती पण संयोजकाच्या कल्पनेपुढे जाऊन या ठिकाणी 50 ते 60 हजार अनुयायी उपस्थित राहिले आणि तथागत बुद्धांना आणि बोधिसत्व डॉ बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी भल्या मोठा रांगा होत्या या ठिकाणी पुस्तकांच्या स्टॉलवरून एक ते दीड लाखापर्यंत ची पुस्तके विक्री झाली आहे तसेच संयोजकाच्या वतीने उपस्थित त्यांना अल्पोपहार पाण्याची सोय करण्यात आली होती. बुद्ध विहार पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील तसेच आंध्रा कर्नाटक सीमा भागातील देखील मोठ्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित राहत आहेत परत एकदा माननीय नामदार संजय जी बनसोडे साहेब यांचे मनःपूर्वक आभार.