
अंबाजोगाई :- तालुक्यातील ममदापुर(पा.) येथील संभाजीराव बडगिरे माध्यमिक विद्यालय येथे तालुका विधी सेवा समिती व वकील संघ अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने मा.उच्च न्यायालयाचे सूचनेनुसार मोबाईल व्हॅन कार्यक्रमा अंतर्गत दि.१९/१०/२०२४ रोजी कायदेविषयक शिबीर(विधी साक्षरता शिबीर) घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री. परेश वाघडोळे साहेब,दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर,अंबाजोगाई हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री. सचिन मेहता साहेब, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व मा.श्री. बालविर गोडबोले साहेब, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर हे होते.
यावेळी अँड.सारंग मुंडे यांनी “राष्ट्रीय बालिका दिवस” या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की,मुलींनी शिक्षण घेऊन मोठे झाले पाहिजे व आपणही मुलापेक्षा कमी नाहीत हे दाखवून दिले पाहिजे नाही तर मुलींना मोलमजुरी करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. तसेच अँड.कौशल्या गडदे यांनी महिला सुरक्षेसंबंधी जनजागृती या विषयावर महिला साठी असलेल्या कायद्याबाबत व महिलांनी सक्षम होण्यासाठी शिक्षण घेऊन त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या कायद्याचा योग्य वापर करून घ्यावा असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना विद्यार्थी व विध्यार्थीनिना मार्गदर्शन करताना मा.श्री. परेश वाघडोळे साहेब,दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर,अंबाजोगाई म्हणाले की, विद्यार्थिनींनी आपल्या सोबत काही अन्याय/अत्याचार होत असेल तर कोणताही संकोच न बाळगता तात्काळ आपण आपल्या गुरुजनांना व आईवडिलांना सांगावे ज्यामुळे मोठा अनर्थ होणे टळेल. तसेच सर्वांनी शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात नाव लौकिक मिळवावा असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील संघाचे उपाध्यक्ष अँड.माणिक आदमाने यांनी केले. यावेळी व्यासपीठावर अंबाजोगाई वकील संघाचे अध्यक्ष अँड.जयंत भारजकर, सचिव अँड.सचिन शेप, सहसचिव अँड.शहाजान पठाण, माजी सरकारी अँड.अशोक कुलकर्णी, मुख्याध्यापक श्री. प्रकाश मठपती हे होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यनारायण सोमवंशी सर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. एकनाथ हरदास सर यांनी केले.
यावेळी ममदापूर येथील ग्रामसेवक, सरपंच, तलाठी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संभाजीराव बडगिरे विद्यालयाचे शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.