
अंबाजोगाई
दिपावली सण नुकताच संपला आता परगावी जाण्यासाठी अंबाजोगाई बसस्थानकामध्ये गर्दी दिसून येत असून नौकरीच्या गावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सध्या अंबाजोगाई बसस्थानक गजबजले आहे येथील बसस्थानकाकडून सोलापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, परभणी,हिंगोली या मार्गावर ज्यादा बसेस सोडण्यात आल्याची माहिता आहे
सध्या सर्वत्र परगावी जाण्याचे दिवस आहेत नुकतीच दिवाळी संपली दिवाळी सणानिमित्त घरोघरी नवचैतन्याचे वातावरण होते संपूर्ण दिवाळी साजरी करून आता नोकरदारांना नोकरीवर जाण्याची वेळ आली आहे तसेच उरलेल्या सुट्ट्याचे अनेकांनी नियोजन केले असून धार्मिक स्थळ, पर्यटन स्थळ या ठिकाणी देखील जाण्यासाठी सामान्य जनांची धावपळ आहे राज्य परिवहन महामंडळाने याचीच खबरदारी घेत अनेक ठिकाणी बससेवा सुरू केली आहे असे प्रवाशांनी सांगितले दिवाळीच्या काळात देखील राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मधून प्रवाशांची संख्या लक्षात घेता अनेक जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या आता पुन्हा शहराकडून गावाकडे व विविध धार्मिक आणि पर्यटन स्थळावर जाण्यासाठी प्रवास करणाऱ्यांना ज्यादा बसेस सोडण्यात आले आहेत अंबाजोगाई बस स्थानकावर दिवाळी सण झाल्यानंतर प्रवाशांची मोठया प्रमाणात गर्दी दिसत आहे.