31/05/2025
Spread the love

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

आकर्षक पणत्यांनी उजळलेल्या अंगण रंगीबिरंगी रांगोळ्या रोषणाईच्या माळा आणि नेत्रदीपक आतषबाजीने शहर आणि परिसरात दिपावली साजरी करण्यात आली सायंकाळ पासून मध्यरात्रीपर्यंत अवघे शहर झळाळून निघाले होते दिवाळी सणानिमित्त वसुबारस, लक्ष्मीपूजन,दीपावली पाडवा या सणानिमित्त्याने फटाक्याच्या लखल खटाने शहर उजळून निघाले
शहरात अपूर्व उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली घरोघरी लक्ष्मीपूजन झाले तर पाडव्यानिमित्त आप्तेष्टांच्या गाठीभेटी घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या ही तर वसाहती मोकळे मैदान असलेल्या अंगणात बच्चे कंपनीने मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली दिवाळीच्या निमित्ताने शहर आणि परिसरात शुभेच्छा सर्वाधिक फटाके फोडण्यात आले वेगवेगळे नेत्रदीप फटाक्यांनी डोळ्यांचे पारणे फेडले आकाश कंदील पणत्या रोषणाईंनी परिसर प्रकाशमान झाला होता दरम्यान दिवाळीच्या शुभेच्छांनी सोशल मीडिया ओंसडून वाहत होता मिठाई,फटाके आणि भेटवस्तू अनेकांनी देत दीपावलीच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या सेवाभावी संस्थांनी दीपावली स्नेहमिलन आयोजित करून गरीब, निराधार व्यक्तींना फराळ आणि गरजेच्या वस्तूंचे मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
आमच्याशी संपर्क करा.