31/05/2025
Spread the love

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : केज विधानसभा मतदारसंघात मुख्य व अंतर्गत रस्ते, शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा अशा मुलभूत सोयी सुविधांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. आमदार नमिताताई मुंदडा यांनी गेल्या काही वर्षांत जातीपाती विरहित सर्वसमावेशक समाजकारण व राजकारण करीत, केज मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला. यापुढेही मतदासंघांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी “कमळ” या चिन्हासमोरील बटण दाबून मतदानरूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन अंबाजोगाई शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील गवळीपुरा, मोची गल्ली, गुरूवार पेठ अंबाजोगाई पोस्ट ऑफिस मागील भागातील मतदारांना भाजपाचे कार्यकर्ते व मुंदडा कुटुंबियांचे कट्टर समर्थक अहेमद पप्पूवाले यांनी केले.

महायुतीच्या अधिकृत उमेदवार आ.मुंदडा यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील गवळीपुरा, मोची गल्ली, गुरूवार पेठ अंबाजोगाई पोस्ट ऑफिस मागील भागात परिसरात डोअर टू डोअर पदयात्रा काढण्यात आली. त्यावेळी उपस्थित नागरिकांशी अहेमद पप्पूवाले यांनी संवाद साधला. याप्रसंगी पप्पूवाले यांनी सांगितले की, केज विधानसभा मतदारसंघातील अंबाजोगाई शहरात मुख्य व अंतर्गत रस्ते, शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा अशा मुलभूत सोयी सुविधांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. आमदार नमिताताई मुंदडा यांनी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षांत जातीपाती विरहित सर्वसमावेशक समाजकारण व राजकारण करीत, केज मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला. यापुढेही मतदासंघांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी “कमळ” या चिन्हासमोरील बटण दाबून मतदानरूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी वार्ड क्र- १० मधील गवळीपुरा व मोची गल्ली, गुरूवार पेठ पोस्ट ऑफिसच्या पाठीमागे, येथून माननीय आमदार सौ नमिता ताई अक्षय मुंदडा यांच्या डोअर-टू-डोअर प्रचार केला. यावेळी वार्डमधील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. अहेमद पप्पूवाले, डी.के.अंकल कांबळे, दीपक कांबळे, अजय भाऊ सरवदे, अक्षय शिंदे, जलाल गवळी, नितीन सराटे, संतोष पावडे, रूपेश कोकाटे, बाबा सुर्वे, मुस्तफा रेगीवाले, अनिल पावडे, तक्षशील शिरसाट, आकाश गायकवाड, अनिकेत सरवदे, रोहित शिंदे, बाप्पा कांबळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
आमच्याशी संपर्क करा.