
केज मतदार संघ माझ्या हक्काचा, तुम्ही मुंदडांना प्रचंड मताने विजयी करा, विकासाची हमी मी देते – आ.पंकजाताई मुंडे
अंबाजोगाई (प्रतिनिधी)- केंद्रिय रस्ते वाहतुक मंत्री मा.नितीन गडकरी आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आ.पंकजाताई मुंडे यांची शहरात प्रचंड जाहिर सभा झाली. विधानसभा निवडणूक महाराष्ट्राचं भविष्य ठरविणारी असून या मतदार संघात नमिता अक्षय मुंदडा योग्य उमेदवार ज्यांना विकासाची दृष्टी आहे. मतदारांनी जागृत राहून आपलं भवितव्य घडविण्यासाठी मुंदडांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे. बर्दापुर ते लोखंडी फाटा अवघ्या सहा महिन्यात मी रस्ता मोठा करून देणार मी आश्वासन देणारा मंत्री नसून डंके के जोट पे काम करणारा असल्याचे ठणकावून सांगितले. गडकरींनी स्व.प्रमोदजी महाजन, स्व.गोपीनाथराव मुंडे, स्व.विमलताई मुंदडा यांच्या आठवणीला उजाळा दिला. दरम्यान पंकजाताई मुंडे यांनी महायुतीच्या उमेदवार नमिताताई मुंदडा माझ्या हक्काची जागा असून केज मतदार संघ आमच्यावर प्रेम करणार आहे. राजकिय प्रतिष्ठा बनलेल्या या मतदार संघातून तुम्ही मुंदडांना प्रचंड मतांनी विजयी करा मी तुम्हाला हा मतदार संघ विकासासाठी दत्तक घेणार अशी घोषणा त्यांनी केली.
केज विधानसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांना विजयी करण्यासाठी येथील शंकर महाराज वंजारी वसतिगृह मैदानावर गडकरी मुंडेंची विराट जाहिर सभा संपन्न झाली. प्रारंभी स्व.महाजन, मुंडे, मुंदडा यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर उमेदवारांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या सभेत नितीन गडकरी यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच ही निवडणूक महाराष्ट्राचं भविष्य घडविणारी आणि जनतेचं भाग्य बदलणारी असल्याचे सांगितले. योग्य उमेदवार निवडून दिल्यानंतर सवार्ंंगिन विकास होतो हे सांगताना त्यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. त्यात 60 वर्षे काँग्रेस पक्षाने कारभार केला. गरीबी हटावचा नारा देताना कागदावर वीसकलमी कार्यक्रम राबविला. मात्र चला चपाटे आणि प्रस्थापित भांडवलदाराची चाक्री करत चुकीचे आर्थिक धोरण आणि भ्रष्टाचाराने देश पोखरून ठेवला. आम्ही खोट नाट बोलून जनतेची दिशा भूल करत नाही. ईमानदारीने लोकांची सेवा करणे हा आमचा धर्म अवघ्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत कसा असतो. हे समोर आले. स्व.गोपीनाथराव मुंडे यांची आठवण काढताना तत्कालीन काळात त्यांनीच मला बांधकाम मंत्री पद दिल. ज्यामुळे मी राज्यात रस्ते विकास करू शकलो. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी असताना प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आम्ही आणली. ज्यातुन देशातील साडेतीन लाख ग्रामिण भागाची गावांचे रस्ते दुरूस्त झाले. सिंचन वाढले तरच शेतकर्यांचे उत्पन्न वाढेल. त्यासाठी अनेक नदीजोड प्रकल्प राबविले. सत्ता चालवताना राष्ट्रवाद, विकास, सुशासन, भ्रष्टाचार मुक्त कारभार आणि अंत्योदय हिच आमच्या कामाची पद्धत असल्याचे ते म्हणाले. लोकसभा निवडणूकीत संविधान बदलणार असा विरोधकांनी निरेटव्ह प्रस्तापित केला. मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेल्या घटनेचे तत्व ज्याला कोणीही बदलू शकत नाही ते त्यांनी जाहिर सांगितले. संविधानाची कॉपी हातात घेवून डांगोरा पिटविणार्या काँग्रेस नेत्यांनीच खर्या अर्थाने संविधानाचा मोडतोड करून अनेकदा धोका पोहोचवला. अशी ठिका त्यांनी राहूल गांधींचे नाव न घेता केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो. नमिता मुंदडा सुशिक्षीत उच्च विचारांच्या असून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
आपल्या भाषणात बोलताना पंकजाताईंनी अंबाजेागाई शहराशी असलेला ऋणाणूबंध उल्लेखिल करून स्व.सुनिल काका लोमटे यांची आठवण बोलताना काढली. बीड जिल्ह्यात 1980 पासून कमळाचे फुल राजकारणात फुलते, महाजन, मुंडेंचा जिल्हा असून पुरोगामी जिल्ह्यात सामान्य जनतेचा विश्वास आमच्या नेतृत्वावर आहे. आम्ही विकास कसा करू शकतो. हे पालकमंत्री असताना दाखवून दिले. 2019 विधानसभा निवडणूकीत या मतदार संघात मीच नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली. दिल्याची आठवण करून देताना लोकांनी प्रचंड मतांनी मागच्या वेळी निवडून दिल. त्यांनी देखील जनतेची सेवा करत विकासाची महाचळवळ हाती घेतली. लोकसभा निवडणूकीत
मतांनी जरे हरले. तरी मनाने मी हरले नाही. विकासाचा सुर्य आम्ही कधीच जिल्ह्यात मावळू देणार नाही. जात-पात-पंत धर्म आम्ही माणूसकीचे राजकारण करतो. त्यामुळे माता योगेश्वरीचे आर्शिर्वाद कमळाचे बटन दाबून लोकसभेचा बदला घ्यावा असे ही त्यांनी सांगितले. कमळाच्या फुलावर लक्ष्मी असते. त्यामुळे विकासाला निधी कमी पडणार नाही.
आपल्या भाषणात बोलताना पंकजाताई म्हणाल्या की, विधान परिषदेच्या निवडणूकीत आमदार नमिता मुंदडांनी मला मत दिलं. त्यामुळे आमदार झाले. त्यामुळे ही माझ्या हक्काची जागा असून मतदार संघातील तमाम जनतेने नमिता मुंदडांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले. लोकसभा निवडणूकीत झाले गेले ते विसरून जावे मला विजयाच्या माध्यमातून मान द्या मी तुमचा सन्मान वाढविल्याशिवाय राहणार नाही. हा मतदार संघ विकासासाठी दत्तक घेणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. तुम्ही ऊसाची चिंता करू नका येत्या 25 नोव्हेंबरला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना चालु होणार असल्याची गुड न्युज त्यांनी जाहिर सभेत शेतकर्यांना दिली. तेंव्हा प्रचंड टाळ्या वाजवून लोकांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेदवार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांनी केले.
कार्यक्रमाला व्यासपीठावर जिल्ह्याच्या माजी खा.प्रितमताई मुंडे, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, प्रदेश प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी, अॅड.राजेश्वर आबा चव्हाण, सलीमभाई जहाँगीर, भारत काळे, संतोष हंगे, उषा मुंडे, राणा डोईफोडे, विजयकांत मुंडे, नारायण केंद्रे, रमाकांत मुंडे, सुनिल गलांडे, विष्णु घुले, गणेश कराड, नेताजी शिंदे, डॉ.वासुदेव नेहरकर, भगवान केदार, बाळासाहेब सोनवणे, शरद इंगळे, डॉ.अतुल देशपांडे, अनंत लोमटे, कमलाकर अण्णा कोपले, हनुमंत तौर, सुरेश कराड, संजय गंभीरे, सारंग पुजारी, बालासाहेब पाथरकर, खलील मौलाना बागवान, शेख ताहेरभाई, संतोष शिनगारे, वाजेदभाई खतीब, महादेव मस्के, विलासराव सोनवणे, राजाभाऊ औताडे, अशोक उगले, बालासाहेब शेप, मधुकर काचगुंडे, बालासाहेब दौडतले, विष्णु चाटे, अर्जुन वाघमारे, तानाजी देशमुख, हिंदुलाल काकडे, शंकर उबाळे, मुरलीधर बप्पा ढाकणे, डॉ.सुधीर धर्मपात्रे, लक्ष्मण कर्नर, अॅड.मकरंद पत्की, ठाकुर सुजितसिंह, शेख नबी, दिलीप सांगळे, नंदुदादा मोराळे, अमोल मस्के आदी मान्यवरांचे उपस्थिती होती. कार्यक्रमाचे भाजपाचे राज्य प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी यांनी केले. तर आभार प्रदर्शन सारंग पुजारी यांनी मानले. या सभेला केज मतदार संघातून मोठ्या प्रमाणावर लोकांची उपस्थिती होती.
…………..