
नाशिक (दि. 16 नोव्हें) : नाशिक (पश्चिम) विधानसभा मतदारसंघातील पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) चे अधिकृत उमेदवार प्रा. शिवाजी अशोक खोपे यांना मतदारांचा जबरदस्त पाठिंबा मिळत आहे. संविधान प्रबोधनाच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण करणाऱ्या प्रा. खोपे यांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेसह समाजासाठी दिलेले योगदान आणि लोकहिताची बांधिलकी यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली आहे.
शिक्षण, कृषी आणि योग विज्ञान क्षेत्रातील प्रगाढ ज्ञान व अनुभव असलेल्या प्रा. खोपे यांनी M.A., B.Ed., कृषी आणि योग शिक्षणातील डिप्लोमा तसेच M.A. योगा (Appear) अशा उच्च शैक्षणिक पात्रतेच्या बळावर समाजासाठी सकारात्मक कार्य केले आहे. ते एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रचार सभांना मिळणारा लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि जनतेच्या समस्यांवर ते दाखवत असलेले दूरदृष्टीचे समाधान यामुळे प्रा. खोपे यांचे मतदारांमध्ये विशेष स्थान निर्माण झाले आहे.
“फळा” हे त्यांचे निवडणूक चिन्ह असून, या चिन्हाने मतदारांमध्ये विकासाचे आणि प्रबोधनाचे प्रतीक म्हणून ओळख निर्माण केली आहे. प्रा. खोपे यांनी मतदारसंघातील गरजू वर्गासाठी सातत्याने काम केले आहे, ज्यामुळे महिलांपासून युवकांपर्यंत सर्वच घटक त्यांच्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवत आहेत.

२० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या मतदानासाठी मतदारसंघात उत्साहाचे वातावरण आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणाऱ्या मतदानात प्रा. खोपे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार मतदारांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीमुळे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास जनतेत दिसत आहे. “सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेतृत्वासाठी प्रा. खोपे यांनाच निवडा,” असा संदेश मतदारसंघातील कार्यकर्ते देत असून, प्रा. खोपे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक (पश्चिम) च्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.