17/04/2025
Spread the love

जीवन शिक्षण प्राथमिक विद्यालयात १५० वे नि:शुल्क योग विज्ञान शिबिर

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील जीवन शिक्षण प्राथमिक विद्यालय आणि पतंजलि योग समिती, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दिनांक १० जानेवारी रोजी १५० वे नि:शुल्क योग विज्ञान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

शहर व तालुक्यातील विविध शाळा तसेच महाविद्यालयांतून योग दिंडी आपल्या दारी या अभियानांतर्गत १५० योग विज्ञान शिबिरांतून तब्बल ६५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मागील एक वर्षापासून योगाचे मोफत धडे देण्याचे काम पतंजलि योग समितीचे मुख्य योग प्रशिक्षक माजी सैनिक आयुर्वेदिक चिकित्सक दत्ता सदाशिव लांब हे करीत आहेत. त्यांच्या १५० व्या योग विज्ञान शिबिराच्या सांगता समारोहाचे आयोजन शुक्रवार, दिनांक १० जानेवारी रोजी येथील जीवन शिक्षण प्राथमिक विद्यालय येथे आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्मकुमारी मंजुषा दीदी (प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, अंबाजोगाई.) या होत्या तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून इंजि.परमेश्वर भिसे (योग साधना परिवार,अंबाजोगाई.), नितेश शिराळे (मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा), सौ.स्वप्नाली शिराळे (चेअरमन, पिताजी सारडा नगरी,अंबाजोगाई.), ऍड.जयसिंग चव्हाण (अध्यक्ष, जीवन शिक्षण प्राथमिक विद्यालय,अंबाजोगाई.), अजित माने (सचिव, जीवन शिक्षण प्राथमिक विद्यालय,अंबाजोगाई.), धनंजय इंगळे (प्रभारी, पतंजलि योग समिती,अंबाजोगाई.), मुख्य योग प्रशिक्षक दत्ता लांब व आयोजक सौ.अंजली लोहिया (मुख्याध्यापिका,जीवन शिक्षण प्राथमिक विद्यालय,अंबाजोगाई.) या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.‌ कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्ज्वलन, सरस्वती पूजन आणि विश्वशांती प्रार्थनेने झाली. यानंतर मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात पतंजलि योग समितीकडून योग शिबिराचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन जीवन शिक्षण प्राथमिक विद्यालयाचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना ब्रह्मकुमारी मंजुषा दीदी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी माजी सैनिक दत्ता लांब (योग शिक्षक व प्राकृतिक चिकित्सक) यांचा सत्कार केला. या प्रसंगी ब्रह्मकुमारी मंजुषा दीदी यांनी योग व ध्यनाचे महत्व समजावून सांगितले आणि पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभाशिर्वाद दिले, तर धनंजय इंगळे (प्रभारी, पतंजलि योग समिती, अंबाजोगाई) यांनी योग प्रोटोकॉल शिकवला, योगाचे महत्व विशद केले. तसेच मुख्याध्यापक शिराळे यांनी योग अभ्यास करण्याविषयी योग्य मार्गदर्शन केले. यावेळी लांब यांनी अवघ्या सात मिनिटांत फिटनेससाठी उपयुक्त ठरतील अशी योगातील विविध ८४ आसने करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच शिवतांडव द्वारे मान्यवरांचे स्वागत ही केले. या शिबीरात सहभागी सर्वांना मोफत योग शिक्षण देण्यात आले. यावेळी सुत्रसंचालकांनी लांब यांच्या निःशुल्क, निस्वार्थ योगसेवेचे स्वागत केले. लांब हे भारतीय सैन्यात फिजीकल शिक्षक म्हणून कार्यरत होते. म्हणून त्यांच्या अनुभवाचा आणि मौलिक मार्गदर्शनाचा फायदा सैन्य, पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरत आहे असे सांगून त्यांनी पतंजलि योग समितीच्या योग दिंडी आपल्या दारी या समाजोपयोगी अभियानाचे ही विशेष कौतुक केले. दैनंदिन जीवनात योगाचे काय महत्त्व आहे. ते नि:शुल्क शिकविण्याचे काम लांब हे करीत आहेत. अंबाजोगाई शहर व तालुक्यातील अनेक शाळा व महाविद्यालयातून विद्यार्थ्यांसाठी १५,९,६,३,२ व १ दिवसीय अशा एकूण १५० योग प्रशिक्षण शिबीरे घेवून यात तब्बल ६५ हजारांहून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना दिनचर्या, आहार, योगिक डि.बिन्द्रिक, प्राणायाम, सर्व प्रकारचे आसन, योगनिद्रा, ध्यान यांचा अभ्यास व योगाचे धडे देण्याचे मौलिक काम माजी सैनिक लांब हे करीत आहेत. २१ वर्षे भारतीय सैन्य दलात असताना देखील लांब यांनी दरमहा आपली आर्धी पगार गोर-गरीबांसाठी खर्च केली आहे. सैन्यात देशसेवा करून सेवानिवृत्तीनंतर मागील एक वर्षांपासून अधिक काळ ते आपली आर्धी पेंन्शन सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करीत आहेत. ही खरच प्रेरणादायी व कौतुकास्पद बाब आहे. माजी सैनिक लांब हे योगाच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहेत. अंबाजोगाई शहर व परिसरातील युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक यांना निःशुल्क, मोफत योग सेवा देवून त्यांचे स्वास्थ निरोगी राहण्यासाठी ते आहोरात्र प्रयत्नशील आहेत. माजी सैनिक योग प्रशिक्षक लांब यांनी योग क्षेत्रात अंबाजोगाईसह बीड जिल्ह्याचे नांव जगात उंचावले आहे. लांब यांच्या योग दिंडी आपल्या दारी या अभियानाची नोंद व आपण केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची माहिती व प्राप्त विविध संस्थांची प्रशस्तीपत्र लांब यांनी पतंजलि योगपीठ हरिद्वार, भारत स्वाभिमान न्यास येथे जमा केली. लांब यांनी केवळ साडेपाच मिनिटांत केली ८४ आसने करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पतंजलि योगपीठ हरिद्वार येथील शिबिराचे सुप्रसिद्ध आस्था चॅनेल वरून संपूर्ण जगभरात लाईव्ह प्रसारण करण्यात आले. ज्याचा लाभ जगभरातील योग अभ्यासकांनी घेतला होता. माजी सैनिक लांब यांच्या कार्याची दखल घेऊन योगगुरू रामदेव बाबा, आचार्य बालकृष्ण व केंद्रीय प्रभारी, भारत स्वाभिमान यांनी कौतुक करून त्यांचा यथोचित सन्मान ही केला अशी माहिती या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक कुलकर्णी मॅडम यांनी देवून उपस्थितांचे आभार मानले. या बाबत संवाद साधला असता योग प्रशिक्षक लांब यांनी सांगितले की, मागील महिन्यामध्ये जीवन शिक्षण प्राथमिक विद्यालय या शाळेला भारत स्वाभिमान न्यासकडून योगामध्ये उष्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रशस्तीपत्र दिलेले आहे. युवा पिढीसाठी आम्ही योग शिबीरे आयोजित करीत आहोत. आजसह मिळून आयोजित एकूण सर्व १५० शिबिरांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ही सर्व शिबीरे विद्यार्थ्यांसाठी मोफत आयोजित करण्यात आलेली होती. या पुढेही निःशुल्क आणि मोफत योग प्रशिक्षण देण्याचे काम आम्ही करणार आहोत. त्याचा लाभ अंबाजोगाईतील सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन माजी सैनिक योग प्रशिक्षक लांब यांनी केले आहे.

=======================

नोट – बातमी सोबत फोटो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
आमच्याशी संपर्क करा.