17/04/2025
Spread the love

धम्म उपासकांनी सहभागी व्हावे – तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण यांचे आवाहन

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
परळी तालुक्यातील वसंतनगर तांडा, मौजे चांदापुर (तिर्थक्षेत्र दर्जा – क प्राप्त) येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही रविवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी अकराव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्म परिषदेला अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे कार्याध्यक्ष पुज्य भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो (पुर्णा) यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या धम्म परिषदेचे उद्घाटक म्हणून पुज्य भिक्खू थेर इम चांग व्वू (मुख्य संस्थापक, बुलम्वांगडोंगजोल विहार, दक्षिण कोरिया) तर विशेष अतिथी म्हणून पुज्य भिक्खू डॉ.लि.ची.रान (माजी कुलगुरू, कोरियन बुध्दीस्ट विद्यापीठ, दक्षिण कोरिया), पुज्य भिक्खू महाविरो थेरो (काळेगाव अहमदपुर), पुज्य भिक्खू धम्मशील थेरो ( शिवणी, बीड) आणि पुज्य भिक्खू पय्यावर्धन (हिंगोली) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त स्मृतीशेष शंकरराव जगतकर नगरी, चांदापुर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. या धम्म परिषदेचे ‘सम्यक संकल्प’ या पेजवरून फेसबुक लाईव्ह थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. याचा लाभ धम्म उपासकांनी घ्यावा असे आवाहन धम्म परिषदेचे अध्यक्ष ऍड.अनंतराव जगतकर यांनी केले आहे.

तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण, चांदापूर, जेतवन (ता.परळी, जि.बीड) यांच्या वतीने तालुक्यातील चोखामेळा सहकारी सोसायटी, वसंतनगर तांडा, मौजे चांदापूर, ता.परळी येथे रविवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त स्मृतीशेष शंकरराव जगतकर नगरी येथे अकराव्या बौद्ध धम्म परिषदेची सुरूवात सकाळी ९ वाजता पंचरंगी धम्म ध्वजारोहणाने होईल.

या धम्म परीषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधिनीचे अध्यक्ष ऍड.अनंतराव जगतकर हे असणार आहेत. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार संजय दौंड, माजी लेफ्टनंट कर्नल डॉ.एम.एच.कांबळे तर यावेळी नालंदा अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर वडमारे, सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले, कृषी तज्ज्ञ डॉ.मधुकर खळगे, समाजभूषण आनंद वाघमारे, बौद्धाचार्य आनंद तुपसमुद्रे, मिलिंद नरबागे, श्रावण बनसोडे, महादेव बनसोडे, प्रशांत गित्ते (ग्रा.पं.सदस्य,चांदापूर.), उपमुख्याध्यापक विलास गायकवाड, संग्राम गीते (सरपंच चांदापुर) गोल्ड मेडल प्राप्त वंदना राहुल सुरवसे, बौद्धाचार्य सचिन रणखांबे तसेच प्रसिद्धीप्रमुख प्रा.बालाजी जगतकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, ज्या उपासकांना धम्म परीषदेला उपस्थित रहावयाचे आहे. त्या धम्म उपासकांनी पांढरे वस्त्र परिधान करूनच धम्म परिषदेत सहभागी व्हावे तसेच वसंतनगर तांडा, चांदापूर (ता.परळी वैजेनाथ) या ठिकाणी धम्म परिषदेस येताना पुस – नंदागौळ – वसंतनगर तांडा मार्गेच यावे. असे आवाहन संयोजन समितीने केले आहे. धम्म परिषदेच्या यशस्वितेसाठी तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण चांदापूर, जेतवन (ता.परळी वै. जि.बीड) चे पदाधिकारी चंद्रकांत इंगळे, प्रा.प्रदीप रोडे, राजेंद्र घोडके, राहुल घोडके, प्रा.गौतम गायकवाड, व्यंकट वाघमारे, सचिन वाघमारे, जगन सरवदे, विश्वनाथ भालेराव, सीमाताई इंगळे चंद्रकांत बनसोडे शाहीर गौतम सरवदे, सुरेश कांबळे किशोर इंगळे आकाश वेडे सुशिल इंगळे सर नागेश जोंधळे राहुल सुरवसे बी एस बनसोडे हे प्रयत्न करीत आहेत. तर चांदापुर येथे ११ व्या बौध्द धम्म परीषदे निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमास या विभागातील उपासकांनी मोठ्या संख्येने सहभागी असे आवाहान करण्यात आले आहे

नोट – बातमी सोबत फोटो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
आमच्याशी संपर्क करा.