
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
तालुक्यातील कुंबेफळ येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी गणेश वसंतराव भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
रविवार, दिनांक २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत कार्यालय कुंबेफळ (ता.अंबाजोगाई) यांच्या वतीने श्री मारूती मंदिर येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर ग्रामसभेतून गणेश वसंतराव भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंचक्रोशीत गणेशराव भोसले यांना आबा या नांवाने सर्वजण ओळखतात. भोसले हे सामाजिक कार्यात सदैव सहभागी व अग्रेसर असतात. एक कुशल संघटक व मितभाषी व्यक्तीमत्व म्हणून ते सुपरिचित आहेत. गणेशराव आबा भोसले यांची निवड बिनविरोध झाल्याने त्यांचे केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.नमिताताई मुंदडा, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलासराव सोनवणे, सरपंच लिंगेश्वर तोड़कर, उपसरपंच प्रमोद भोसले, माजी अध्यक्ष सुनिल आडसूळ, शिक्षक संतोष गायकवाड आणि कुंबेफळ (ता.अंबाजोगाई) येथील समस्त ग्रामस्थांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करून पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
=======================